नाशिक: येवला शहरातून नगर मनमाड राज्य महामार्गावर एका कंटेनर चालकाने अंदाधुंद पद्धतीने कंटेनर चालवत अनेक वाहनांना उडवलं. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. हा तरुण त्याच्या आईसोबत बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगला गेला होता. मात्र, त्याचवेळी हा अपघात घडला आणि त्याने त्याच्या आईसमोर अखेरचा श्वास घेतला.

कोपरगाव येथून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास नगर मनमाड राज्य महामार्गावर येवला शहरातील हद्दीत फत्तेबुरुज नाका ते विंचूर चौफुली येथे धुमाकूळ घालत अनेक वाहनांना धडक दिली. यावेळी त्याने चारचाकी, दुचाकी वाहनांना आणि एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. अपघातानंतर त्या मद्यधुंद चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.

वरातीत गोळीबार, तेवढ्यात अनर्थ घडला; चिमुकलीने आई-वडिलांसमोरच प्राण सोडले
या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची चर्चा असून जखमींचा आकडा समोर आला नसलेला तरी एका तरुणाने मात्र यात आपला जीव गमावला आहे. त्यानंतर पोलिसांनी मनमाड जवळील अंकाई पाटी परिसरात सदरच्या कंटेनर चालकाला पकडलं. या ठिकाणी हा कंटेनर पलटी झाल्यामुळे हा कंटेनर चालक पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.

रोशन मच्छिंद्र वाघमोडे वय १९ रा. विखरणी तालुका येवला असे या घटनेत ठार झालेल्या युवकाचे नाव असून बहिणीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी तो येवला शहरात आलेला होता. या संदर्भात येवला शहर पोलीसांकडून तपास सुरू आहे.

बापरे! नांदेडच्या अल्पवयीन मुली व्हॅलेंटाईन डेसाठी जालन्यात, दामिनी पथकाची नजर पडली…
रोशन मच्छिंद्र वाघमोडे (वय १९) हा आपल्या आई आणि नातेवाईकांसोबत लग्नांच्या खरेदीसाठी गेला होता. तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी त्याच्या सोबत त्याची आई आणि शेजारच्या काही महिला होत्या. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपल्याने धावपळ सुरु होती. त्यातच अशी घटना घडल्याने विखरणी गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here