कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार विजयी झाले आहेत.यामुळे नरके यांना आपला गड शाबूत ठेवता आला असून चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा हे यश मिळवले आहे. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीने शेवटपर्यंत झुंज दिली. परंतु त्यांच्या पॅनेलचा सुपडा साफ झाला.नरके यांच्या विरोधात आमदार पी. एन. पाटील, आमदार, विनय कोरे यांनी ताकद पणाला लावली होती तर गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके व चेतन नरके यांनी विरोधी आघाडीचा थेट प्रचार केल्याने या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.परंतु अटीतटीच्या लढतीतही चंद्रदीप नरके यांच्याकडे सत्ता कायम राहिली. चंद्रदीप नरके यांना आमदार सतेज पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद मिळाल्याने ही लढाई सोपी झाली असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. जसं ठरलंय तसंच केलंय अशा आशयाचे फोटो मतदानाच्या दिवशी पासून सोशल मीडियावर फिरत होते. यामुळे पुन्हा एकदा सतेज पाटील यांचा आमच ठरलय पॅटर्न यशस्वी झाले आहे.

नरके पॅनलची एक हाती सत्ता

कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रविवारी झालेल्या अत्यंत चुरशीने ८२.४५ टक्के मतदानानंतर काल सकाळी मतमोजणीला रमणमळा इथल्या शासकीय धान्य गोदामात सुरवात झाली आणि मतमोजणी रात्री ११ च्या सुमारास संपली. एकूण ३५ टेबलांवर प्रत्येकी ४ कर्मचारी असे एकूण १४० कर्मचारी मतमोजणी करत होते. तर २३ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके विरुद्ध आ. पी. एन. पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

चंद्रदीप नरके किंग तर सतेज पाटील किंगमेकरच्या भूमिकेत :

कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यावर गेली १८ वर्षे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची सत्ता होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद लावल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अशातच गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी उघडपणे विरोधी आघाडीस पाठिंबा दिला होता तर त्यांचे पुत्र चेतन नरके थेट प्रचारात उतरत प्रचार सुरू केला होता. तर गोकुळच्या राजकारणात चंद्रदीप नरके यांनी सतेज पाटील यांना साथ दिली होती. अरुण नरके हे सत्तेत असताना गोकुळ विरोधातील मोर्चात ते पुढे राहिले. त्याची परतफेड म्हणून पाटील यांनी नरके यांना पाठिंबा दिला.

पोटच्या पोराने २५ वर्षीय तरुणाला संपवलं, बापाला जबर धक्का, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास

रविवारी झालेली मतदानात “जसं ठरलंय….तसंच करतोय” अशाप्रकरचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते.सतेज पाटील यांच्यासह गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांचीही साथ चंद्रदीप नरके यांना मिळाल्याने नरके गटाची ताकद वाढली आणि याचा प्रभाव विरोधकांवर पडू लागला. विरोधकांनी केलेल्या आरोपांना कोणतीही भीक न घालता मतदारांनी आपले मतदान नरके यांना देत आपला कौल विजयाच्या माध्यमातून दाखवून दिला. प्रचाराच्या काही दिवसांवरच सतेज पाटील यांनी नरके यांना पाठिंबा दिल्यामुळे सतेज पाटील यांचा “आमचं ठरलंय” पॅटर्न पुन्हा चर्चेत आला आहे.यामुळे सध्या नरके जरी कुंभी कासारी कारखान्याचे किंग ठरले असले तरी सतेज पाटील हे त्यांचे किंगमेकर ठरले आहेत.

Mumbai News: जीव वाचवण्यासाठी आजी-आजोबांनी घरातून भांडी खाली फेकली, मुंबईतील थरारक घटना

नरके गटाचे विजयी उमेदवार:

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे अनिल पाटील, भगवंत पाटील, बाजीराव शेलार, राहुल खाडे, किशोर पाटील, दादासो लाड, उत्तम वरुटे, सर्जेराव हुजरे, विश्वास पाटील, सरदार पाटील, संजय पाटील, अनिष पाटील, प्रकाश पाटील, बळवंत पाटील, वसंत आळवेकर, प्रकाश पाटील, राऊ पाटील, विलास पाटील, धनश्री पाटील, प्रमिला पाटील, युवराज शिंदे, कृष्णात कांबळे.

मनसेचा भाजपला पाठिंबा जाहीर होताच ‘बोलघेवडे पोपट’ म्हणत राष्ट्रवादीचा हल्लाबोल, कोथरुडचा इतिहास काढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here