नवी दिल्ली : टाटा समुहाची एअर इंडियाने फ्रान्सच्या एअरबस कंपनीकडून 250 विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये 40 वाइड बॉडी ए-३५० विमाने आणि २१० नॅरो बॉडी विमानांचा समावेश आहे. ऑर्डर वाढवण्याचा पर्यायही करारात ठेवण्यात आला आहे. अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एअर इंडिया-एअरबस भागीदारीच्या लॉन्चिंगला हजेरी लावली.

लघुशंका प्रकरणी एअर इंडियावर मोठी कारवाई; ठोठावला ३० लाखांचा दंड, पायलट निलंबित
कार्यक्रमात सामील झाल्याबद्दल माझे मित्र इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आभार: पंतप्रधान मोदी
टाटा आणि एअरबसच्या भागिदारी करारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या ऐतिहासिक करारासाठी मी एअर इंडिया-एअरबसचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी आमच्यात सामील झाल्याबद्दल मी आमचे मित्र इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विशेष आभार मानू इच्छितो. हा महत्त्वाचा करार भारत आणि फ्रान्समधील सखोल संबंध तसेच भारताच्या नागरी उड्डाण क्षेत्रातील यशाचे प्रतिबिंब आहे.

देशाचे दुर्गम भागही हवाई मार्गाने जोडले जात आहेत: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देणार्‍या उडान योजनेद्वारे आम्ही देशाच्या दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडत आहोत. भारताच्या मेक इन इंडिया – मेक फॉर द वर्ल्ड व्हिजन अंतर्गत एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक नवीन संधी पुढे येत आहेत.

Air India Pee-gate: एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशांना Unlimited दारू मिळते का? काय आहेत नियम जाणून घ्या!
भारत देखभाल आणि दुरुस्तीचे केंद्र बनेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला पुढील १५ वर्षांत २००० हून अधिक विमानांची आवश्यकता असेल. भारत या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्रासाठी देखभाल आणि दुरुस्ती केंद्र बनू शकतो.

होय,आमच्याकडून दिरंगाई झाली.. एअर इंडिया लघुशंका प्रकरणी टाटा ग्रुपचे चेअरमन स्पष्ट बोलले
भारतासोबतची भागिदारी पुढे नेण्याची संधी : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
या करारावरून हे दिसून येते की एअरबस आणि सर्व फ्रान्स भागीदार भारतासोबत भागीदारी वाढवण्यासाठी काम करत आहेत. भारतासोबत आपण खूप काही साध्य केले आहे. हे भागिदारी पुढे नेण्याची ऐतिहासिक संधी आपल्याकडे आहे. तसेच महामारी संपल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये अधिक देवाणघेवाण व्हायला हवी. फ्रान्समध्ये विद्यार्थी, शास्त्रज्ञ, कलाकार, व्यापारी, महिला, पर्यटक यांचे स्वागत आहे. मी सर्वांना भारत-फ्रान्स मैत्रीचा भाग होण्यासाठी प्रोत्साहित करतो. असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यएल मॅक्रॉन यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here