जैसलमेर: अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर काही जणांनी त्याला जबरदस्ती मूत्र पाजलं. त्याचं मुंडण करण्यात आलं. जिल्ह्यातील चौहटन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

काही लोक एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. अनैतिक प्रेमसंबंधांवरून या केल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणाला झाडा बांधलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणाला जबरदस्तीने मूत्र पाजले, तसेच त्याचे मुंडण करण्यात आले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाला काही जणांनी झाडाला बांधले आहे. त्याचे मुंडण केले असून, त्याला जबरदस्तीने मूत्र पाजले, असे या व्हिडिओत दिसते. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात जायला नको, असं दोन्ही गटांनी परस्पर संमतीने ठरवले. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून गंभीर दखल घेतली आणि आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक अजित सिंह हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, चौहटनचे एसएचओ पेमा राम हे २८ जुलैला गस्तीवर होते. त्यावेळी त्यांनी हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला. पोलीस चौकशीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. अनैतिक संबंधांवरून हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी पीडित तरुणाच्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली. तक्रार दाखल करण्याबाबत विचारणा केली असता, दोन्ही पक्षकारांनी तक्रार दाखल करायची नाही असं ठरलं आहे. आम्ही तक्रार दाखल करणार नाही, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी अखेर व्हिडिओच्या आधारे कलम २४९, ३२३ आणि ३४२ अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. लवकरच, पीडित तरुणाची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here