aniruddha deshpande, मोठी बातमी: शरद पवारांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडेंच्या पुण्यातील कार्यालयावर Income Tax विभागाची धाड – income tax raid at ncp chief sharad pawar close aid aniruddha deshpande office in pune maharashtra
Pune local news | गेल्या काही दिवसांमध्ये आयकर विभागाकडून देशाच्या अनेक भागांमध्ये धाडी टाकल्या जात आहेत. कालच बीबीसी वृत्तसंस्थेच्या कार्यालयात आयकर विभागाचे कर्मचारी धडकले होते.
आयकर विभागाच्या पुण्यात धाडी
हायलाइट्स:
पुण्यात सहा ठिकाणी आयकर खात्याची छापेमारी
अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर छापा
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाने पुण्यात एकूण सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे. आता या धाडसत्रातून काय निष्पन्न होणार, ते पाहावे लागेल. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. आयकर विभागाने मंगळवारी बीबीसी वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज आयकर विभागाकडून पुण्यात छापे टाकण्यात आले आहेत.