Balasaheb Thorat daughter in Politics | गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर निवडणुकीच्यानिमित्ताने अहमदनगरच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्यजीत तांबे काँग्रेसमध्ये परत येणार की नाही, याबाबत अद्याप साशंकता आहे.

 

Balasaheb Thorat daughter in politics
जयश्री देशमुख-थोरात यांचं राजकारणात लाँचिंग

हायलाइट्स:

  • सत्यजीत तांबेंचं तळ्यात-मळ्यात
  • बाळासाहेब थोरातांकडून मुलीचं राजकीय लाँचिंग
अहमदनगर: भाचा आमदार सत्यजित तांबे काँग्रेसची साथ सोडण्याच्या मार्गावर असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली मुलगी डॉ. जयश्री थोरात-देशमुख यांचे राजकारणात लाँचिंग केले आहे. थोरात यांचे संगमनेरमधील जंगी स्वागत आणि डॉ. जयश्री यांचा वाढदिवस हे निमित्त साधून थोरात यांनी सूचक वक्तव्य करून डॉ. जयश्री यांच्या अधिकृत राजकीय प्रवेशाचे संकेत दिले. कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात सक्रीय आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी कधीही परिवाराचे नाव पुढे केले नाही. एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी ब्लड कॅन्सर विषयावर एमडी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील ब्लड कॅन्सर विभागात काम केले. चार वर्षांपासून एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातूनही त्यांचे काम चालते. थोरात यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली. विवाहानंतरही मतदारसंघात त्या थोरात म्हणूनच ओळखल्या जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने तांबे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यावर थोरात यांच्या वारसदार म्हणून डॉ. जयश्री यांच्या नावाची चर्चा अधिक जोरकसपणे सुरू झाली. थोरात रुग्णालयात असताना मतदारसंघात त्या सक्रीय राहिल्या.
Maharashtra Politics : बाळासाहेब थोरातांचे ‘कमबॅक’; सत्यजीत तांबेंचं काय होणार?
सोमवारी रात्री थोरात जेव्हा तालुक्यात परतले, तेव्हा त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यावेळी डॉ. जयश्री यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना थोरात यांनी डॉ. जयश्री यांचा आवर्जून उल्लेख करून कार्यकर्त्यांनी डॉ. जयश्री यांना स्वीकारल्याचे आणि त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केल्याबद्दल आभार मानले. शिवाय डॉ. जयश्री आता इकडे म्हणजे राजकारणात चांगल्या रमल्या आहेत, असेही सांगून टाकले. याच कार्यक्रमात थोरात यांनी भाचे आमदार तांबे यांना काँग्रेसमध्ये परत येण्याचा सल्ला दिला. मात्र, दुसऱ्या दिवशी तांबे यांनी सूचक ट्विट करून वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी जाहीर कार्यक्रमांत आपल्या मुलीला राजकारणात उतरविल्याचे संकेत दिले आहेत. सत्यजीत तांबे यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. पक्षाचा निर्णयही भविष्यात होईल. आता डॉ. जयश्री यांच्यासाठी काय तरतूद करणार? त्यांच्यासाठी थोरात स्वत: थांबणार का? त्यांचा पक्ष कोणता असणार? हेही आता हळहळू स्पष्ट होईल.
बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरमध्ये जंगी स्वागत, भाचा सत्यजीतला दिला हा मोलाचा सल्ला

असाही सावध पवित्रा

डॉ. जयश्री यांच्या नावाने एक ट्विटर हँडल बऱ्याच दिवसांपासून कार्यरत होते. मधल्या राजकीय घडामोडीत त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणारी पोस्ट करण्यात आली होती. त्याची चर्चा सुरू होताच. स्वत: थोरात यांनी दवाखान्यात असतानाही पुढाकार घेत ते अकाऊंट फेक असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार केल्याचेही म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here