नवी दिल्ली: देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय देणारी घटना नवी दिल्लीत घडली. दीड वर्षांचा एक चिमुरडा १५ मिनिटं वॉशिंग मशीनमधील साबणाच्या पाण्यात पडला होता. पाण्यात पडून असल्यानं त्याचं शरीर काळं निळं पडलं. सात दिवस तो कोमामध्ये होता. त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं. यानंतर १२ दिवस त्याच्यावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. आता त्याची प्रकृती ठीक आहे.

दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात चिमुकल्याला आणण्यात आलं, त्यावेळी तो बेशुद्धावस्थेत होता. त्याच्या शरीराची हालचाल बंद होती. त्याला श्वास घेण्यास त्रास व्हायचा. त्याच्या हृदयाचे ठोके अतिशय कमी झाले होते. पल्स आणि बीपी खूप कमी होता. शरीर काळंनिळं पडलं होतं. मात्र त्यानंतर चिमुकला वाचला. हा प्रकार चमत्कार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. विशेष म्हणजे चिमुकल्याच्या मेंदूला कोणतीही इजा झाली नाही.
चल फिरायला जाऊ! कारमध्ये बसवलं अन् जीवानिशी संपवलं; शेजारच्या सीटवर बॉडी ठेऊन ४० किमी फिरला
आई दुसऱ्या खोलीत गेली अन् अनर्थ घडला
वॉशिंग मशीनचं झाकण उघडं होतं आणि त्यात चिमुकला जवळपास १५ मिनिटं पडून होता, असं आईनं सांगितलं. ‘मी त्यावेळी खोलीच्या बाहेर गेले होते. परतले तेव्हा तो कुठेच दिसला नाही. काही वेळ मुलाला शोधण्यात गेला,’ असा घटनाक्रम आईनं सांगितला. ‘मुलगा वॉशिंग मशीनमध्ये १५ मिनिटांपेक्षा कमी वेळ राहिला असावा. कारण त्यापेक्षा अधिक वेळ राहिला असता, तर त्याचा जीव वाचवणं अवघड झालं असतं. त्यामुळे मुलाचा जीव वाचणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही,’ असं डॉ. नागपाल म्हणाले.
IITचा विद्यार्थी पोहायला नदीत उतरला; बाकीचे मित्र VIDEO काढत राहिले; कॅमेऱ्यात मृत्यू कैद
अनेक अवयवांनी काम करणं थांबवलं
चिमुकल्याला रुग्णालयात आणण्यात आलं, त्यावेळी त्याची प्रकृती अतिशय नाजूक होती. साबणाच्या पाण्यामुळे त्याचे अवयव काम करत नव्हते. फुफ्फुसावर परिणाम झाला होता, असं डॉ. हिमांशी जोशी यांनी सांगितलं. ‘चिमुकल्याला chemical pneumonitis झाला होता. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात धोकादायक पदार्थ जातो, तो फुफ्फुसासाठी घातक किंवा विषारी असतो, त्याला chemical pneumonitis म्हटलं जातं,’ अशी माहिती जोशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here