नवी दिल्ली: सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. बुधवारी वायदे बाजारात सोने-चांदीच्या दरात नरमाई दिसून येत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाल्याने मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही (एमसीएक्स) किमतीत घसरणीचा कल दिसून आला. अशा प्रकारे जर आज तुम्ही सोन्याचे दागिने किंवा चांदीच्या भांडी खरेदीला जात असाल तर पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागणार नाही. चला तर मी जाणून घेऊया सोन्या-चांदीच्या किमतीत किती ब्रेक दिसला.

ITR Form: प्राप्तिकर रिटर्न भरण्याची लगबग करा; ITR फॉर्म जारी, जाणून घ्या अंतिम तारीख
सोन्याचे वायदे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स), एप्रिल २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ३६९ रुपये किंवा ०.६५ टक्क्यांनी घसरून ५६ हजार ३८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर घसरला आहे. मागील सत्रात, एप्रिल करारासाठी सोन्याचा भाव ५६,७५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्याचप्रमाणे जून २०२३ च्या करारातील सोन्याचा भाव ३७३ रुपये किंवा ०.६५ टक्क्यांनी घसरून ५६ हजार ७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. यापूर्वी मागील सत्रात जून करारातील सोन्याचा भाव ५७ हजार ०७३ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होता.

नवं घर घेण्याचा विचार करताय? या बँकांमध्ये मिळेल गृहकर्जासाठी सर्वात कमी व्याजदर
वायदे बाजारात चांदीची किंमत
एमसीएक्सवर मार्च २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ३८६ रुपये किंवा ०.५८ टक्क्यांनी ६५,८६५ रुपये प्रति किलोवर घसरला असून मागील सत्रात याचा भाव ६६,२५१ रुपये प्रति किलो होता. तर मे २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ३८७ रुपये किंवा ०.५७ टक्क्यांनी घसरून ६७,२७९ रुपये प्रति किलो होता. लक्षात घ्या की दुकानात दागिने खरेदी करताना टॅक्स जोडला जात असल्यामुळे खरेदीदारांना बाजारभावापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.

SBI चे सुपरहिट म्युच्युअल फंड, गुंतवणूकदारांसाठी ठरले रिटर्न मशीन, जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव
जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे तर त्यात देखील घसरणीसह व्यवसाय होताना दिसतोय. कॉमॅक्सवर सोने आज $१,८५२.८५ प्रति औंस आणि या किमती एप्रिल फ्युचर्ससाठी आहेत. आज सोन्याचा भाव $१२.५५ किंवा ०.६७ टक्क्यांनी घसरले आहेत. दुसरीकडे, जागतिक बाजारात चांदीच्या दरात $०.१७५ प्रति औंसची किंवा ०.८० टक्क्यांनी घसरून $२१.६९८ प्रति औंसवर झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here