या लग्नातील खास जेवणासाठी जवळपास २५ क्विंटल मटन, १५ क्विंटल चिकन आणि १० क्विंटल मासे बनवले जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे लग्नात मुलाकडील लोक शाहाकारी आहेत. माजी खासदार आनंद मोहन यांचे होणारे जावई शाहाकारी असून त्यांच्यासाठी खास शाहाकारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शाही लग्नसोहळ्यात अनेक प्रकारच्या मिठाईदेखील ठेवण्यात आल्या आहेत. यात गुलाबजामून, रसगुल्ला, इमरती, मुगडाळीचा हलवा असे १० वेगवेगळे प्रकार आहेत. या लग्नासाठी जवळपास १५ हजार लोक येणार असल्याची माहिती आहे. या सर्व लोकांसाठी खास सुविधा करण्यात आली आहे.
३ लाख रसगुल्ले
लग्नात ५० क्विंटलहून अधिक नॉनव्हेज असणार आहे. तसंच आतापर्यंत ६० हजारहून अधिक रसगुल्ले बनवण्यात आले असून जवळपास ३ लाख रसगुल्ले बनवले जाणार आहे.
आनंद मोहन यांची मुलगी सुरभी आनंदचं लग्न राजधानी पटनातील बैरिया भागात एका खास फॉर्ममध्ये होणार आहे. या फार्ममध्ये एक आयलंड असून त्याच्या चारही बाजूने कृत्रिम तलाव बनवण्यात आला आहे. याच आयलंडवर सुरभी आनंदच्या लग्नाचा मंडप बनवण्यात आला आहे. या आयलँडची क्षमता जवळपास २०००० हजार लोकांची आहे. मागील १५ दिवसांपासून हे फॉर्म तयार केलं जात आहे.
या लग्नसोहळ्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह अनेक राजकीय दिग्गज उपस्थित राहणार आहेत. बिहार सरकारमधील जवळपास सर्वच मंत्र्यांना या लग्नासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
कोण आहे जावई?
सुरभी वकील आहे. तर सुरभीचे होणारे पती आणि माजी खासदार आनंद मोहन यांचे जावई यूपीएससी पास आहेत. ते भारतीय रेल्वेत ए क्लास ऑफिसर आहेत.