नवी मुंबई : कोपरखैरणेतील कांचनगंगा सोसायटीच्या विरुद्ध बाजूला असलेल्या खाडी किनाऱ्यालगतच्या झुडपामध्ये रविवारी सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या गळ्यावर ओढणीने व्रण आढळून आले असून कोपरखैरणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरखैरणेतील कांचनगंगा सोसायटीच्या विरुद्ध बाजूला असलेल्या खाडीलगतच्या झुडपांमध्ये अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला. रविवारी सायंकाळी खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला हा मृतदेह निदर्शनास आला होता. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. सदर महिलेची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह खाडीमध्ये ढकलून दिला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

घराबाहेर फेरी मारली, दार उघडताच चिठ्ठी देत डाव साधला,राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला

या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच या महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास कोपरखैरणे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, नवी मुंबईत गेल्या काही दिवसांत महिलांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वेळा प्रेमसंबंधातून किंवा वाद विवाद झाल्याने या घटना घडल्याचे समोर आले आहे. अशातच आता पुन्हा एकदा महिलेचा ओढणीने गळा दाबून मारून टाकले आणि कोपरखैरणे खाडी किनारी या अज्ञात महिलेचा मृतदेह फेकल्याचं निदर्शनास आलं आहे. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत असून महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here