दाऊदची पहिली प्रेयसी मंदाकिनी

संपूर्ण जगामध्ये दहशत पसरवणारा दाऊदही प्रेमात पडला. हे प्रेम होतं बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री मंदाकिनीसोबत. या दोघांचं लव्ह अफेअर अनेक दिवस चाललं. राज कपूरचा चित्रपट ‘राम तेरी गंगा मेली’ पडद्यावर आला आणि चित्रपटातील नायिकेचे सौंदर्य पाहून सगळेजण थक्क झाले. या सिनेमात मंदाकिनीने अनेक बोल्ड सीन्सही दिले. यामुळे बॉलिवूडपासून चक्क दुबईपर्यंत मंदाकिनीची चर्चा रंगली.

दाऊदवर मंदाकिनीची जादू
मंदाकिनीची खास अदा पाहून दाऊद आधीच भाळला होता. ९० च्या दशकामध्ये दाऊद मुंबईहून दुबईला राहायला गेला. तेव्हा अनेकदा मंदाकिनी दाऊदला भेटण्यासाठी दुबईलाही गेली. त्यातूनच त्यांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम फुललं. अनेकदा दोघे एकत्र वेळ घालवतानाही दिसले होते. ज्यावेळी दोघांचे क्रिकेटच्या मैदानावर बसल्याचे अनेक फोटो माध्यमांमध्ये व्हायरल झाले तेव्हा डॉनच्या या प्रेम कथेवर संपूर्ण जगाचा विश्वास बसला. दाऊद आणि मंदाकिनीचं हसणं-बोलणं हे फोटो सर्व काही सांगतात. मात्र, त्यांचं प्रेम फार काळ टिकलं नाही. नंतर मंदाकिनी दाऊदपासून वेगळी झाली.
दाऊदची दुसरी प्रेयसी अनिता अयूब

९० च्या दशकामध्ये देव आनंद यांनी बॉलीवूडमध्ये नवा चेहरा आणला. देवानंद यांनी आपल्या ‘प्यार के तराने’ या चित्रपटांमध्ये अनिता अयूबला नाईकाच्या भूमिकेत सादर केलं. ही निरागस दिसणारी मुलगी पाकिस्तानची असली तरी तिने भारतातील लोकांच्या हृदयात जागा मिळवली. हा चित्रपट फार काही चालू शकला नाही पण अनिता अयूब तिच्या सौंदर्यासाठी नक्कीच प्रसिद्ध झाली. पोलिसांपासून स्वतःला लपवून दुबईत असलेल्या दाऊतचं अनिता अयूबवरही जीव जडला. सगळ्यात भयंकर म्हणजे दाऊदने अनिता अयूबसाठी मुंबईतील एका चित्रपट निर्मात्याची हत्याही केल्याची चर्चा आहे. दारूच्या प्रेमाची ही दुसरी कहाणी अनेक दिवस लोकांसाठी चर्चेत होती. पण नंतर सगळं काही शांत झालं. अनिता अयूबने पाकिस्तानच्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं. त्यामुळे तीदेखील दाऊदच्या नावामुळे चर्चेचा विषय ठरली.
दाऊदची तिसरी प्रेयसी महविश हयात

पाकिस्तानातील अभिनेत्री महविश हयातसोबत दाऊदचे संबंध होते. महविश ही पाकिस्तानची प्रसिद्ध नायिका आहे. दाऊदच्या सांगण्यावरूनच पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीमध्ये महविशला अनेक चित्रपटही मिळाल्याचे बोलले जाते. तुम्हाला वाचून धक्का बसेल की महविश ही दाऊदपेक्षा १७ वर्षांनी लहान होती. महविशचं नाव अधिकच चर्चेत आलं जेव्हा तिला तमगा-ए-इम्तियाज या पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानमध्ये दोघांच्याही चर्चांना उधाण आलं. खरंतर, महविशला अंडरवर्ल्ड डॉन डाऊनची बाहुली असेही म्हटले जाते.
दाऊदची चौथी प्रेयसी सुजाता…

दाऊद इब्राहिमचं हृदय चौथ्यांदा धडकलं ते सुजातासाठी. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा दाऊद मुंबईत राहायला होता. त्याचे मुंबईत सायकलचे दुकान होते. दुकानाजवळच सुजाताचं घर असल्याचे बोलले जाते. तो नेहमी सुजाताला येताना-जाताना पाहायचा. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर दोघांनी प्रेमाचे पूल बांधले. दाऊदला कोणत्याही किंमतीमध्ये सुजातासोबत लग्न करायचं होतं. पण सुजाताच्या कुटुंबियांनी त्याला स्पष्ट नकार दिल्याचे बोलले जाते. सुजाता ही पंजाबी कुटुंबीयातील होती तर दाऊद इब्राहिम हा मुस्लिम होता. त्याचं सुजातावर इतकं प्रेम जडलं की त्याने थेट चाकू घेऊन सुजाताच्या घरी गेला. मात्र नंतर सुजाताने त्याला समजावलं आणि परत जाण्यासाठी सांगितलं. सुजाता न सापडल्यानंतरच मेहजबिन दाऊदच्या आयुष्यात आली आणि या अंडरवर्ल्ड डॉनने तिच्याशी विवाह थाटला. दाऊद आणि मेहसबिन यांना एक मुलगी आणि दोन मुलं अशी तीन मुलं असल्याचं बोललं जातं.