मुंबई : शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असतानाही गुंतवणुकदारांमध्ये म्युच्युअल फंडची मोठी क्रेझ आहे. SIP द्वारे रिटेल गुंतवणुकदार म्युच्युअल फंडमध्ये मोठी गुंतवणूक करतान दिसत आहेत. मागील महिन्यात एसआयपीद्वारे १३,८५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एसआयपीद्वारे लहान गुंतवणूक करुन मोठे रिटर्न्स मिळवता येतात. दीर्घकाळ गुंतवणूक करुन कोट्यवधींचा फंड जमा करू शकता. म्युच्युअल फंड्सच्या अशा अनेक स्कीम आहेत, ज्यात दीर्घकाळासाठी सरासरी वार्षिक १२ टक्के रिटर्न्स मिळतात.

वयाच्या ४५व्या वर्षी कसे व्हाल कोट्यधीश?

SIP दीर्घकाळासाठी ठेवल्यास कम्पाउंडिंगचा मोठा फायदा होता. जर तुमचं वय २५ वर्ष असेल आणि तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी २० वर्ष इतका ठेवला असेल, तर याचा मोठा फायदा होईल. SIP Calculator नुसार, तुम्ही वयाच्या २५व्या वर्षी दर महिन्याला १० हजार रुपयांची एसआयपी सुरू केल्यास तुम्ही वयाच्या ४५व्या वर्षी १ कोटींचा फंड जमवू शकता. यात एकूण गुंतवणूक २४ लाख आणि रिटर्न्स ७५.९२ लाख रुपये इतके असतील. गुंतवणुकीच्या एकूण २० वर्षांच्या कालावधीमध्ये वर्षाला सरासरी १२ टक्के रिटर्न आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची कोणतीही गॅरेंटी नसते. बाजारातील परिस्थितीनुसार वार्षिक रिटर्न्स कमी-जास्त होत असतात. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गुंतवणुकदारांचा एसआयपीकडे कल वाढतो आहे. त्यामुळे एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सतत वाढते आहे. २०२३ मध्ये गुंतवणुकदारांनी SIP द्वारे १३,८५६ कोटींची गुंतवणूक केली. एसआयपी अकाउंट्सची संख्या ६.२१ कोटी झाली आहे. दर महिन्याला छोटी बचत करुन दीर्घ कालावधीसाठी ही गुंतवणूक सतत करणं गरजेचं आहे. यातून कोट्यवधींची रक्कम जमा करता येईल.

SIP गुंतवणुकीची एक सिस्टमेटिक पद्धत आहे. दीर्घकाळासाठी अनेक फंड्सचे रिटर्न्स सरासरी १२ टक्के आहे. या रिटर्नची कोणतीही गॅरेंटी नसून हे रिटर्न्स बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात. त्यामुळे गुंतवणुकदारांनी आपलं इन्कम, टार्गेट आणि बाजारातील जोखीम पाहून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ १०० रुपयांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here