नवी दिल्ली: शेअर बाजारातून कमाई करण्यासाठी योग्य गुंतवणूक रणनीतीची जाणीव असणे आवश्यक आहे. सध्या बाजारात अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली असली तरी असे अनेक शेयर्स आहेत, जे गुंतवणूकदारांना भरपूर कमाई करून देत आहेत. बाजारातील स्मॉलकॅप कंपनी, डब्ल्यूपीआयएल (WPIL) लिमिटेडच्या शेअर्समध्ये मंगळवारी ७ टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळली आणि सध्या स्टॉक १,७४९ रुपयावर पोहोचला. यादरम्यान, स्टॉक इंट्राडेमध्ये शेअर १०% वाढून ५२ आठवड्यांची उच्चांकी रु. १,७९१.६५ वर पोहोचला.

WPIL चा शेअर
तीन रुपयाच्या या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आतापर्यंत ६० हजार टक्क्याहूनही अधिक मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. १७९१ ही शेअरची ५२ आठवड्याची सर्वोच्च पातळी आहे तर नीचांकी पातळी ८०२.४० रुपये इतकी आहे. तसेच बाजाराच्या मागील पाच सत्रात शेअरमध्ये तेजी दिसत असून स्टॉक सुमारे ५३ टक्के वाढला आहे. याच कालावधीत शेअरने १,१५८ वरून १,७४५ रुपयांवर उसळी घेतली आहे.

Short Selling नेमकं असतं काय? तुम्हीही करू शकता ‘शॉर्ट सेलिंग’, होईल तगडी कमाई
दरम्यान शेअरच्या इतिहासाबद्दल बोलायचे तर २८ फेब्रुवारी २००३ रोजी WPIL चा शेअर मुंबई शेअर बाजारात २.८० रुपयात उपलब्ध होता. तर १४ फेब्रुवारी रोजी १७४५.०५ रुपयांवर पोहोचला. या कालावधीत गुंतवणूकदारांना ६२,४०० टक्क्यांचा परतावा दिला आहे. अशाप्रकारे २८ फेब्रुवारी २००३ रोजी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असेल तर त्याला आता ६.२३ कोटी रुपये मिळाले असते.

याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! एका शेअरवर मिळणार २०० रुपयाचा लाभांश, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
कंपनीचे तिमाही निकाल
इतकंच नाही तर मागील चार ट्रेडिंग सत्र कंपनीच्या शेअर्समध्ये ५३ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने अलीकडेच डिसेंबरच्या तिमाहीत उत्कृष्ट निकालांची नोंद केली ज्याचा परिणाम शेअर्सवरही होताना दिसत आहे. या कालावधीत, कंपनीचा करानंतरचा नफा (PAT) वार्षिक ४५९ टक्क्यांनी वाढून ८३.७० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक १०६ टक्क्यांनी वाढून ५०७.२ कोटींवर पोहोचला आहे. या तिमाहीत एबिटा मार्जिन देखील ७३२ बेस पॉईंट्सने २०.९ टक्केपर्यंत वाढले.

बाजारात LIC चा शेअर पुन्हा धडाम! गुंतवणूकदार धास्तावले, आता पुढे काय? तज्ज्ञ म्हणतात…
कंपनीबद्दल जाणून घ्या
WPIL भारतातील एक प्रमुख पंप आणि पंपिंग सिस्टम कंपनी म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे. कंपनीने जागतिक स्तरावर आपल्या कार्याचा विस्तार केला असून सध्या इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, झांबिया, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये तिच्या समूह कंपन्यांद्वारे उत्पादन करतेय. याशिवाय कंपनी नवीन बाजारातही विस्तार करत आई आणि या क्षेत्रातील जागतिक लीडर बनण्याकडे त्यांचे लक्ष आहे.

(नोट: येथे दिलेली माहिती केवळ स्टॉकच्या कामगिरीबद्दल आहे, तो गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे जोखमीच्या अधीन असून गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here