रत्नागिरी : कोकणात कोकणात महाविकास आघाडीत मोठा भूकंप झाला असून बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती यांच्याकडून महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर चिपळूण येथे मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे चार व शिवसेना ठाकरे गटाच्या दोन महिला माजी नगरसेविका अशा एकूण सहा माजी नगरसेवकांनी मंगळवारी उशिरा मुबई येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

प्रशांत यादव यांच्या राजीनाम्याने खळबळ

आमदार योगेश कदम व त्यांचे समर्थक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते नासिर खोत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी चिपळूण येथील नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यापाठोपाठ आता चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ डाली आहे. याविषयी राजीनामा दिलेले चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे दोन्ही मोबाईल नॉट रिचेबल लागत आहेत.

उडत्या पाखरांना परतीची… सत्यजित तांबे म्हणतात, ती तर आवडलेली कविता, ट्विटचा वेगळा अर्थ काढू नका
प्रशांत यादव मोठा राजकीय निर्णय घेणार ?

प्रशांत यादव हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. रात्री उशिरा नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करतानाच माझ्यावर जो विश्वास दाखवलात तो सार्थ ठरवू, चिपळूणच्या विकासाला गती देऊ, अशी ग्वाही दिली. काँग्रेसचे माजी नगरसेवक सुधीर शिंदे, करामत मिठागरी, हारून घारे, संजीवनी शिगवण, शिवसेनेच्या माजी नगरसेविका स्वाती दांडेकर, संजीवनी घेवडेकर आदींनी मुख्यमंत्री शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच अजूनही मोठ्या घडामोडी चिपळूणच्या राजकीय पटलावर होणार असल्याचे बोलले जात आहे.

वारंवार सांगून कंटाळले, शेवटी आमदारांनीच थेट जेसीबीमध्ये बसून बॅरिकेड हटवून टाकले, पाहा व्हिडिओ
आठ दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी केले होते सूचक विधान

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री उदय सावंत यांनी वाशिष्ठी डेअरीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रशांत यादव यांचे कौतुक करत थेट सूचक विधान व्यासपीठावरून केले होते. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात ही मोठी राजकीय घडामोड झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना व्यासपीठावरूनच सांगितले होते की, ‘स्वामींचा आशीर्वाद आपल्याला आहेच, पण भविष्यात तुम्हाला मुख्यमंत्री शिंदे यांचा आशीर्वाद लागणार असेल तरी विचार करा.’ यावेळी वाशिष्टी डेअरी प्रकल्पाचे कौतुक करतानाच पुढच्या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या इथे नक्कीच येथील प्रकल्प उभा करुन सकारात्मक विचार केलात अशी सूचक विधाने केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम हेही उपस्थित होते.
पुण्यात खळबळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, भररस्त्यात गैरवर्तन केल्याचा आरोप

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here