ऑनलाइन सामान घरपोच करणारी कंपनी Blinkit चे संस्थापक अलबिंदर ढींडसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅलेंटाइन डेला कंडोम आणि मेणबत्ती या दोन वस्तूंची मोठी विक्री झाली आहे. इतर उत्पादनांमध्ये पुरुषांसाठी डिओडोरेंट, महिलांसाठी परफ्यूम, गुलाब, पुष्पगुच्छ आणि चॉकलेटचा समावेश आहे. त्यांनी ट्विटरवर काही रिपोर्टही शेअर केले. यातील एका रिपोर्टनुसार, ब्लिंकिटने १० हजारांहून अधिक गुलाब विकले आणि १० वाजेपर्यंत १ हजार २०० पुष्पगुच्छ विकले गेले.
व्हॅलेंटाइन डेला कंडोमची विक्रमी विक्री
सुपरमार्केट चालवणारी कंपनी Foodstuffs चे नॉर्थ आयलँड आणि न्यूझीलंडमध्ये ३३० स्टोर आणि २४ हजार फूडी स्टॉल आहेत. Foodstuffs च्या एका रिपोर्टनुसार, या वर्षी पूर्ण व्हॅलेंटाइन वीकदरम्यान फूल आणि गिफ्टपेक्षाही कंडोमची मागणी सर्वात जास्त होती. या बरोबरच पर्सनल ल्युब्रिकेंटच्या विक्रीतही ६१ टक्के वाढ दिसली.
गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ शी तुलना केल्यास या व्हॅलेंटाइन वीकमध्ये कंडोमची २२ टक्के अधिक विक्री झाली आहे. ‘यूएस नॅशनल रिटेल फेडरेशन’च्या म्हणण्यानुसार, तरुणांमध्ये व्हॅलेंटाइन डेचा मोठा उत्साह असतो. आरोग्य आणि लैंगिक संबंधांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १३ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कंडोम दिनही साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंडोमची खरेदी होते. पाश्चिमात्य देशांमध्ये कंडोमची निर्मिती करणाऱ्या कंपन्या याची तयारी करतात. चांगली विक्री व्हावी म्हणून व्हॅलेंटाइन डेच्या काही दिवस अगोदर बाजारात विविध प्रकारच्या ऑफर्स आणल्या जातात.