नवी मुंबई: पनवेल शहरातील खांदेश्वर वसाहतीमध्ये खाटीक बापाने स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बापानेच विकृतपणाचा कळस ओलांडल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ माजली आहे. खांदेश्वर वसाहतीमध्ये एका खाटीकाने स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये नराधम बापाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खाटीक बापाने चार महिन्यांपूर्वी देखील मुलीवर बलात्कार केला होता. पीडिता १४ वर्षांची असून दोन महिन्यांची गरोदर राहिली आणि त्यानंतरच तिच्या आईला या धक्कादायक घटनेबाबत समजले.

एकाच कॉलेजमधील दोन विद्यार्थांच्या आयुष्याची अखेर; दोन घटनांनी औरंगाबादेत खळबळ…
नवीन पनवेल येथील निगाहे करम या मटण विक्रीच्या दुकानावर मुलगी खर्चासाठी पैसे आणण्यासाठी बापाकडे गेल्यावर त्याने हा विकृत प्रकार केल्याचे तक्रारीत आईने म्हटले आहे. या नराधम बापाने विकृत कृत्य करून पीडित मुलीला आणि तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अनेक दिवस ही पीडित मुलगी गप्प राहिली होती.

अखेर तिच्या प्रकृतीच्या तक्रारीनंतर आईला संशय आल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. पीडित मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी मुलीच्या विविध तपासण्या केल्या, तेव्हा त्यांना कळालं की तिच्यावर अत्याचार झाले असून ती दोन महिन्यांची गरोदर आहे. तपासणी अहवालानंतर आईने ताबडतोब पोलीस ठाण्यात धाव घेतली. या सर्व घटनेमुळे खांदेश्वर परिसरामध्ये खळबळ पसरली आहे.

कुटुंबात नन्ह्या परीचं आगमन, घरी आनंदीआनंद; तितक्यात ६ सेंटिमीटरची शेपूट दिसली, डॉक्टर्सही हैराण
या विकृत घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे वैशाली गलांडे या करीत आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी बलात्कार आणि बालक लैंगिक शोषण प्रतिबंध कायद्यानुसार संशयित आरोपी विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

खाटीक बापाने आपल्याच मुलीवर बलात्कार करून मुलगी आणि पित्याच्या नात्याला काळीमा फासली आहे. खाटीक बापाच्या या कृत्याने आजूबाजूच्या परिसरासह पनवेल शहरामध्ये खळबळ माजली आहे. खाटीक बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याने अनेकजण याबाबत संताप व्यक्त करत आहेत. तसेच या खाटीक बापाला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे अशी संतप्त भूमिका परिसरातून व्यक्त केली जात आहे. खाटीक बापाच्या या विकृत कृत्याला पोलीस काय शिक्षा करणार याकडे संपूर्ण पनवेल शहराचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here