नवी दिल्ली : लिव्ह इन पार्टनर निक्की यादवची हत्या करणाऱ्या साहिल गेहलोत विषयी त्याच्या कुटुंबातच संतापाची भावना आहे. त्याच्या नातेवाईकांनीच साहिलवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली आहे. साहिलच्या अटकेनंतर त्याच्या नवविवाहित पत्नीसह अख्खं कुटुंब अज्ञातस्थळी रवाना झालं आहे.

साहिलचा गुन्हा उघडकीस आल्यापासून आमचा परिवार किंवा गावातील कोणीही त्याला भेटलेलं नाही, किंवा पाठिंबाही दर्शवला नाही. एका महिलेची हत्या आमच्या समाजात मान्यच नाही. त्यामुळेच आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकायचं ठरवलंय, अशी भूमिका साहिल गेहलोतचा नातेवाईक जयवीर सिंह गांधी यांनी घेतल्याचं वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलं आहे.

२४ वर्षीय गर्लफ्रेण्ड निक्की यादवची हत्या केल्याप्रकरणी साहिल गेहलोत याला मंगळवारी अटक करण्यात आली. लग्नाच्या १२ तास अगोदर ९ आणि १० फेब्रुवारीच्या दरम्यानच्या रात्री त्याने निक्कीचा खून केला. साहिलचं गावातील दुमजलं घर अजूनही लग्नाच्या रंगात सजलं होतं. दिव्यांची रोषणाई केलेल्या घराचं दार मात्र कुलूपबंद होतं. घरापासून १०० मीटर अंतरावर पोलिसांचं पथक गस्त घालत आहे.

साहिलचं लग्न त्याचे मामा हवासिंग यांनी ठरवलं होतं. लग्नाची सगळी तयारीही त्यांनीच केली होती. त्यामुळे त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढावली आहे. वधूपक्षाला कसं तोंड दाखवायचं, हा प्रश्न त्यांना पडला आहे.

तरुणीच्या ‘त्या’ इच्छेमुळे कॉलबॉय वैतागला, न्यूड फोटो बाहेर, सोलापुरात तरुणावर गुन्हा
पोलीस येऊन साहिलला अटक करेपर्यंत कुणाला याची कुणकुणही लागली नव्हती. साखरपुडा, लग्न, सगळे सोहळे व्यवस्थित पार पडले. खून केल्यानंतर साहिलच्या चेहऱ्यावर कुठलेच अपराधी भाव नव्हते, असं साहिलच्या लग्नाला उपस्थित राहिलेले काही जण सांगतात.

जागा बघायला आली नि कॉटेजवर घेऊन गेली, अलिबागमध्ये हनिट्रॅप, मुंबईत महिला जाळ्यात
दरम्यान, प्रेयसीची हत्या करुन साहिलने योग्य केलं, असं म्हणत नाही, पण परिस्थितीचा विचार करा, तो चहूबाजूंनी कोंडीत सापडला होता. त्याची प्रेयसी वेगळ्या जातीतील होती, आमच्या समाजात ते मान्य नाही. साहिलचं लग्न जिच्याशी झालं, तिच्या कुटुंबात एकही कर्ता पुरुष नाही, जर साहिलने लग्न केलं नसतं, तर तिचं आयुष्य मातीमोल झालं असतं, असा युक्तिवाद साहिलच्या महिला नातेवाईकाने केला आहे.

ना मंडप , ना बॅंड-बाजा, ना वऱ्हाडी; लाखोंचा खर्च टाळला अन् केलं असं लग्न की सगळ्यांनाच नवरा-नवरीचं कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here