मुंबईः मुंबईतील लोकप्रिय मुच्छड पानवाला यांच्या पानाच्या दुकानावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने (अँटी नारकोटिक सेल) छापेमारी केली आहे. खेतवाडी येथे असलेल्या दुकानात ही छापेमारी करण्यात आला असून दुकानातील गोदामातून जवळपास १४ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. यात ई-सिगारेटचा समावेश आहे. पोलिसांनी शिवा पंडित उर्फ शिवकुमार तिवारी याला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मुंबई क्राइम बँचच्या अँटी नारकोटिक्स सेलने ही कारवाई केली आहे. ई-सिगारेटच्यासंबंधित ही छापेमारी असून पोलिसांनी १५ लाखांचा माल जप्त केला आहे. एएनसीने पुढील तपास व्ही.पी रोड पोलिसांना सोपवला आहे. दरम्यान, याआधीही एनसीबीने गांजाची तस्करी करण्याच्या आरोपाखाली मालक शिवकुमार तिवारी याला अटक केली होती.