रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कुंवारबाव येथे एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने तब्बल आठ गाड्यांना धडक दिल्याचा धक्कादाक प्रकार घडला आहे. या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. काल संध्याकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीत शहराजवळील कुंवारबाव येथे हा थरारक प्रसंग घडला आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका सातपुते नावाच्या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, ही घटना झाल्यानंतर या प्रकरणाची तक्रार कोणीच केलेली नव्हती. मात्र, पोलिसांकडून दखल घेत या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा असे प्रकार घडू नयेत अशी वॉर्निंग जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी दोन कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. तर एक कर्मचारी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सध्या उपचार घेत आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर ते या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेऊन आहेत.

Stock Market Opening Today: गुड न्यूज! बाजारात आज खरेदीचे संकेत, सेन्सेक्स-निफ्टी वधारले
नेमकं काय घडलं?

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ केली असल्यामुळे ही घटना घडली होती, हे आता स्पष्ट झालं आहे. या सगळ्या प्रकाराने काल एकच खळबळ उडाली होती. काल संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कुंवारबाव येथे एक पोलीस कर्मचाऱ्याने तब्बल आठ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली. हा पोलीस कर्मचारी नाणीज येथील बंदोबस्त आटपून आपल्या जवळील गाडी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येत असताना हातखंब्याच्या पुढे कुंवारबावकडे येत होता. तिथे त्याने तब्बल आठ वाहनांना धडक दिली.

दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचारी हा निवृत्त सैनिक असून सध्या जिल्हा पोलीस मुख्यालयात येथे कार्यरत आहे. या घटनेत काही गाड्या तेथे फिरायला आलेल्या पर्यटकांच्या होत्या. ते पर्यटक रत्नागिरीतून बाहेर जात असताना हा अपघात झाला. संबंधित पोलीस कर्मचारी हा दारू पिऊन गाडी चालवत होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून कालच त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आलेली आहे. त्यात हे सिद्द झालं आहे की, हा पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.

Kasba Bypoll: कसब्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस रिंगणात, पुण्यातील बड्या हस्तींची भेट घेत आखला मास्टर प्लॅन

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here