काल सायंकाळच्या वेळी आपल्या शेतातील दैनंदिन काम उरकून रुक्मिणी शंकर गुंडाळ (वय ६५) या आपल्या म्हशीसह घरी परतत असताना एका जीप क्रमांक MH 23 E 4628 या वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. चालकाने या दोघांनाही उडवल्याने महिलेसह म्हशीचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर जीपचा चालक अनिल पारड हा घटना घडल्यानंतरही दुर्लक्ष करून फरार होत होता. परंतु आजूबाजूच्या नागरिकांनी ही सर्व घटना पाहिली आणि त्या जीपचा पाठलाग करून या चालकाला ताब्यात घेऊन चांगला चोप दिला. त्यानंतर वडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना या संपूर्ण घटनेची माहिती देऊन या जीप चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मात्र, या घटनेत ६५ वर्षीय महिला आणि त्यांची एक म्हैस यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी महिलेचा मृतदेह केज रुग्णालयात पाठवून या घटनेची पुढील तपासणी करत आहे. या घटनेतील मद्यधुंद ड्रायव्हर अनिल पारड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची गाडी देखील ताब्यात घेतली आहे. आरोपी ड्रायव्हर सापडल्याने पोलिसांनी या दुर्घटनेबाबत चौकशीचा वेग वाढवला आहे. यामध्ये अशाप्रकारे चालकाने मद्यपान करून ड्रायव्हिंग करणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यात या चालकाकडून एका मुक्या जनावरासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.