जळगाव : घरी कुणालाही काही एक न सांगता निघालेल्या तरुणाचा शेतातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात ही घटना उघडकीस आली आहे. आवेद गबु तडवी (वय २५ वर्ष, रा. न्यू व्यास नगर, यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. मोबाईलवरुन मित्राला फोन केला, आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत अन् काही क्षणात आवेश याने विहिरीत उडी घेवून जीवन संपविले असावे अशी शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे

जळगावात यावल शहरातील विस्तारित भागात न्यू व्यास नगर आहे. चोपडा तालुक्यातील बिडगाव मोहरद या गावातील मूळ रहिवासी असलेला आवेद गबु तडवी हा गेल्या काही वर्षापासून यावल शहरातील न्यू व्यास नगरात कुटुंबासह वास्तव्यास होता. तो त्याच्या एम. एच. १९ ए. एल. १४८५ या क्रमाकांच्या दुचाकीने बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरात कुणाला काही एक न सांगता बाहेर पडला. त्यानंतर तो बेपत्ता झाला.

याच दरम्यान त्याचा शोध घेताना यावल सातोद रस्त्यावर सुनील भोईटे याच्या शेतात एका खोल विहिरीजवळ आवेद याची दुचाकी तसेच त्याची चप्पल आढळून आली. त्यामुळे त्याने शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बालक बाऱ्हे, किशोर परदेशी, संजय देवरे, अनिल साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली व दुपारी दोन वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत विहिरीत त्याचा शोध घेण्यात आला.

घटनेचे वृत्त कळताच यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेत मयताचे प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यासाठी तडवी कुटुंबास मदत केली. मात्र विहिरीला खूप जास्त पाणी असल्याने आणि रात्री अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे आता गुरूवारी सकाळी शोध घेतला जाणार आहे.
Nikki Yadav Murder Case: लिव्ह इन पार्टनरला संपवून लग्नाच्या बेडीत, साहिलच्या नवविवाहित पत्नीचं काय झालं?
आवेद तडवी याच्या पश्चात पत्नी व एक वर्षांचा मुलगा आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या मित्राला फोन करून मला माझ्या लहान मुलाला भेटण्याची इच्छा आहे, असे सांगितले असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे.

साडेसातला घराबाहेर पडले, नंतर कुठे गेले? तीन लेकरांच्या बापाची मारेकरी निघाली त्याचीच…
दरम्यान आवेश याने आत्महत्या का केली यांचे नेमके कारण समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बापाची हौस; मुलाच्या लग्नात नुसता धुरळा; १० ते १२ बाउंसरसह लेक अन् सुनेला घडवली हेलिकॉप्टरची सफर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here