मुंबई: अयोध्येत महाबुद्ध विहार व्हावं म्हणून प्रसिद्ध गायक आता मैदानात उतरले आहे. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागी सापडलेल्या अवशेषावरून तिथे बुद्ध विहारच होते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे अयोध्येत बुद्ध विहार झालंच पाहिजे आणि सापडलेल्या अवशेषांचंही जतन झालं पाहिजे, अशी मागणी करतानाच अयोध्येतील बुद्ध विहारासाठी लढा उभारण्याचं आवाहनही आनंद शिंदे यांनी आंबेडकरी अनुयायांना केलं आहे.

आनंद शिंदे यांनी सोशल मीडियावरून आंबेडकरी जनतेला हे आवाहन केलं आहे. अयोध्येतील उत्खननात सापडलेल्या प्राचीन अवशेषावरून त्या ठिकाणी बाबरी मशिदीपूर्वी बुद्धाची साकेत नगरी असल्याचं सिद्ध होत आहे. या उत्खननात बुद्धाच्या मूर्त्या आणि बौद्ध परंपरेशी नाते सांगणारे अवशेष सापडले आहेत. ऑल इंडिया मिली कौन्सिलनेही त्या ठिकाणी साकेत नगरी असल्याचं मान्य केलं आहे. उत्खननामध्ये सापडलेल्या या प्राचीन अवशेषांचे जतन करण्यासाठी अयोध्येत मोठं संग्रहालय आणि महाबुद्ध विहार झालं पाहिजे. त्यासाठी सर्व बौद्ध नेत्यांनी गटतट विसरून एकत्र यावं. सर्व मतभेद विसरून या प्रश्नावर लढा उभारला पाहिजे, असं शिंदे म्हणाले.

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराला आमचा विरोध नाही. मशिदीलाही विरोध नाही. पण आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. अयोध्येत बुद्ध विहार व्हावं ही आमची मागणी आहे. ही सरकारने पूर्ण करायला हवी. सरकार जर मागणी मान्य करत नसेल तर प्राणांची आहुती देण्यासाठीही सज्ज व्हा, असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे.

राम मंदिराचं भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान कार्यालयाला ३ आणि ५ ऑगस्ट अशा दोन तारखा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैंकी पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राम मंदिराच्या भूमी पूजनात सहभागी होणार आहेत. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी मंदिर ट्रस्टच्या बैठकीनंतर दोन तारखा निवडण्यात आल्या होत्या. शनिवारी सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत चंपत राय यांच्याशिवाय अप्पर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी, कामेश्वर चौपाल, नृत्यगोपाल दास, गोविंद देव गिरी महाराज आणि दिनेंद्र दास यांच्यासहीत इतरही ट्रस्टी उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here