कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन आज आठ वर्षे पूर्ण झाली. मात्र, अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. मारेकरी आजही मोकाट आहेत. तसेच तपास यंत्रणेला तपासात येणाऱ्या अडथळ्यांमुळे होणारी दिरंगाई या सर्वांवर नाराजी व्यक्त करत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉकचे आयोजन केले.

जोपर्यंत हत्येचा तपास लागत नाही, तोपर्यंत लढा देत रस्त्यावर उतरत राहू, असा इशारा कॉम्रेड यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच एन डी पाटील आणि पानसरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

मॉर्निंग वॉकदरम्यान ‘गोविंद पानसरे अमर रहे’, ‘हम सब पानसरे’, ‘पानसरे जी को लाल सलाम’ अश्या घोषणा देत तपास यंत्रणांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घरासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये पानसरे यांचा मृत्यू झाला, तर उमा पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या.

आज या घटनेला आठ वर्षं पूर्ण झाली. मात्र, अद्याप मारेकऱ्यांचा सुगावा तपास यंत्रणेला लागलेला नाही. तसेच सध्या हा खटला न्यायालयात आहे. पानसरे तपासातील एसआयटीच्या धीम्या गतीमुळे हायकोर्टाने कुटुंबियांच्या विनंतीनुसार काही महिन्यांपूर्वी हा तपास एटीएसकडे वर्ग केला गेला आहे. सध्या संशयित आरोपीवर दोषनिश्चिती करण्यात आली असून पुरावे, कागदपत्र गोळा करण्याचे काम सुरू आहे.

मी जे बोललो ते सत्यच, बाकीचं योग्य वेळी बोलेन; पहाटेच्या शपथविधीबाबात फडणवीसांचं पुन्हा वक्तव्य

ज्या ठिकाणी गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, त्या ठिकाणी आज डाव्या चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी मेघा पानसरे देखील उपस्थित होत्या. यावेळी खऱ्या मारेकऱ्यांचा शोध घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तपास यंत्रणा अद्याप मुख्य अरोपींपर्यंत पोहचू शकलेली नाही. त्यामुळे, आज मॉर्निंग वॉक दरम्यान निषेध नोंदवण्यात पानसरे यांच्या घरापासून ते पानसरे यांच्या स्मृती स्थळापर्यंत काढण्यात आला. यावेळी पानसरे कुटुंबीय तसेच कॉम्रेड आणि अनुयायी उपस्थित होते.

साहेबांनी सुपारी घेतलीये, तू मन लावून नाच; कसब्यात उमेदवार भाजप-काँग्रेसचे, वाद मनसे-राष्ट्रवादीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here