पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्या मानवी वस्तीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे अवघड झालं आहे. मात्र, आता शहरी भागातही बिबट्या येऊ लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. त्यातच खेड तालुक्यातील चाकण शहरात मध्यवस्तीत बिबट्या आढळून आला होता.

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन विभाग, रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुणीही जखमी झालं नाही. बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

साहेबांनी सुपारी घेतलीये, तू मन लावून नाच; कसब्यात उमेदवार भाजप-काँग्रेसचे, वाद मनसे-राष्ट्रवादीत
चाकण शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात आल्यानंतर सैरभैर झालेला बिबट्या पहिल्यांदा चाकणच्या मुख्य बाजारपेठेत आढळला. त्यानंतर वन विभागाला आणि पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. या भागातील सीसीटीव्ही तपासले असता बिबट्या असल्याची खात्री झाली. त्यानंतर बिबट्या पकडणारी रेस्क्यू टीम आणि वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली.

वन विभाग आणि रेस्क्यू टीमने बाजारपेठेत लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. काही वेळ बिबट्या सैरभैर पळत राहिला. मात्र, थोड्या वेळात तो बेशुध्द पडला आणि स्थनिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. बिबट्या आल्याने चाकणमधील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. तसेच शेजारी असलेल्या शाळेतील मुलांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता.

बिबट्याला पकडल्यानंतर सर्वांनी रेस्क्यू टीम आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. वनविभाग आणि रेस्क्यू टीमने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

रात्रीचा काळोख जिवावर बेतला; घरी जाताना ‘त्या’ खडीच्या ढिगाऱ्याने केला घात; लेकासमोर आईने सोडला प्राण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here