मुंबई : मुंबईतील सांताक्रुझ भागात असलेल्या निवासी संकुलातील सार्वजनिक ठिकाणी कथित ‘अश्लील वर्तन’ केल्याबद्दल घरमालक आणि त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांताक्रुझ पूर्वेकडील वाकोला येथील रमन एसआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या एका रहिवाशाकडे आलेली पाहुणी गेल्या आठवड्यात इमारतीमध्ये कपडे न घालता फिरत होती. ही महिला इमारतीच्या कंपाऊंडच्या विविध ठिकाणी अश्लील कृत्ये करत होती, याची माहिती घरमालकाला होती, असा रहिवाशांचा आरोप आहे.

पाचव्या मजल्यावर लिफ्टसमोरील विजेचा बल्ब गायब झाल्यानंतर गेल्या आठवड्यात सीसीटीव्ही फुटेज पाहताना सोसायटीतील सदस्यांना या घटनेची माहिती मिळाली. फुटेज पाहताना त्यांच्या लक्षात आले की, गेल्या सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास महिलेने फ्लॅटमधून बाहेर पडताना कोणतेही कपडे घातले नव्हते.

“आम्ही इतर मजल्यांवरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले, तेव्हा ती अख्ख्या इमारतीत कपडे न घालता फिरताना आणि अनेक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत ती घाणेरडे चाळे करत राहिली” असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हे घडताना घरमालक स्वतःच्या घरी अन्य मित्रासोबत होता. महिला नग्नावस्थेत इमारतभर फिरत आहे, याची त्याला जाणीव असल्याचा आरोप रहिवाशांनी तक्रारीत केला आहे.

आरोपी घरमालक हा गेल्या काही वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या महिलांना फ्लॅटवर घेऊन येतो, त्याला याआधीही याबाबत बजावण्यात आलं आहे. तो खरं तर दुसऱ्या इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहतो. मात्र मध्ये-मध्ये वेगवेगळ्या महिलांसोबत फ्लॅटवर येत असतो. यापूर्वीही तो त्याच्या काही मैत्रिणींसोबत अश्लील कृत्य करताना आढळून आला होता. त्यामुळे त्याचे आणि इमारतीतील इतर रहिवाशांचे जोरदार भांडण झाले होते, असेही तक्रारीत म्हटले आहे.

तरुणीच्या ‘त्या’ इच्छेमुळे कॉलबॉय वैतागला, न्यूड फोटो बाहेर, सोलापुरात तरुणावर गुन्हा
आम्ही हे अश्लील प्रकार याआधी दुर्लक्ष केले होते; मात्र इमारतीच्या कॉमन भागात असभ्य कृत्य करणाऱ्या महिलेकडे कानाडोळा करायला तयार नसल्याचे शेजारी म्हणतात.

अमेयने ढकललं नाही, मीच घसरुन पडले असेन; ‘जीव घेण्याच्या प्रयत्न’ प्रकरणी प्रियांगीचा दावा
आम्ही कलम २९४ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करणे) आणि ११४ (प्रवृत्त करणे) अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह कृत्य करताना आढळलेल्या घरमालक आणि महिलेवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नवरदेवाचा रुबाब, नवरीचा थाट; नगरपासून अंमळनेरपर्यंत चर्चा फक्त सूनबाईच्या रॉयल एन्ट्रीचीच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here