मुंबईः पत्नीचा पासपोर्ट लवकर येण्यासाठी उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने केलेले कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. गाजियाबाद येथे राहणाऱ्या बाबू शाह याने पत्नीचा पासपोर्ट क्लिअर करण्यासाठी थेट मुंबई पोलिसांची वेबसाइट हॅक केली आहे. सिव्हिल इंजिनीअर असलेल्या शाहला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी नोकरीसंदर्भात परदेशात जाणार होती. त्यामुळं त्याला तिला इम्प्रेस करायचं होतं. शाहच्या पत्नीने पासपोर्टसाठीची कागदपत्रे जमा केली होती. या कादगपत्रांमध्ये कोणत्याच त्रूटी नव्हत्या. मात्र, पासपोर्ट येण्यास विलंब होत असल्याने बाबू शाह यांने मुंबई पोलिसांची वेबसाइट हॅक केली आणि पत्नीचा पासपोर्टही क्लिअर केला. तसंच, कोणाला संशय येऊ नये म्हणून अन्य दोघांचे पासपोर्टही क्लिअर केले. दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीचा पासपोर्ट अडवून ठेवला आहे. तर आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

दारु पिण्यासाठी पैसै नव्हते, नातवाने गाठली कौर्याची सीमा, आजीसोबत घडलं भयंकर
तरुणाने ज्या दोघांचे पासपोर्ट क्लिअर केले त्या मुंबईतील अँटॉप हिल, चेंबूर आणि टिळक नगर येथील रहिवासी आहेत. आरोपीने नोएडा येथील आयपीएस अॅड्रेस असलेली सिस्टम वापरली होती. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या बाबू शाह याला पोलिसांनी अटक केली आहे. शाह यूपीत एका भाड्याच्या घरात राहतो. तर त्याची पत्नी मुंबईत काम करते. दरम्यान, शाहला पोलिसांच्या वेबसाइटचा अॅक्सेस कसा मिळाला हे मात्र पोलिसांनी सांगण्यास नकार दिला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’च्या दुकानात मुंबई पोलिसांची धाड; सापडलं मोठं घबाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here