वाशिम: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. आंतरपीक म्हणून देखील तूर लावली जाते. यंदा तुरीला समाधानकारक दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीन आणि कापसाला अपेक्षेप्रमाणं दर मिळत नसला तरी तुरीच्या चागंल्या दरामुळं शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. तुरीनं आज ८३०० चा टप्पा पार केला. मागील दोन दिवसात तुरीच्या दरात घसरण होत असल्याचे तिचे चित्र होते. आज मात्र पुन्हा तुरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी आवकही वाढली असून शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसून आलं.


राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये आज तुरीने साडेआठ हजारांचा टप्पा गाठलाय तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला किमान ७७५० ते कमाल ८२०० रुपये इतका दर मिळाला आहे वाशिम मध्ये १९२० क्विंटल तुरीची आवक झाली. तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजारपेठेमध्ये तुरीला कमाल ८२५५ इतका दर मिळाला आहे. वाशिमच्याच अनसिंग उपबाजार समितीतही तुरीला चांगले दर मिळाले असून तिथे किमान ७५५०ते ८३०० इतका उच्चतम दर मिळाला आहे.

पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढण्यावरुन वाद, मुंबईत BMW कारच्या काचांची तोडफोड

यंदा तुरीचे उत्पादन घटले असले तरी चांगले दर मिळत असल्याने उत्पन्नातील तफावत भरून निघत आहे त्यामुळे शेतकरी समाधानी असून सध्या बाजारात तुरीची आवक वाढली आहे.

Kasba Bypoll: भाजपचा घायाळ वाघ अखेर मैदानात, गिरीश बापट कसब्यात सभा घेणार

सोयाबीनचे दर स्थिर

एकीकडे तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असताना सोयाबीनच्या दराने मात्र शेतकऱ्यांची निराशा केली आहे. मागील आठवड्यात ५४०० पर्यंत गेलेल्या सोयाबीनच्या दरात या आठवड्यात सातत्याने घट झाली आहे. आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला किमान ४८५० ते कमाल ५२५० इतका दर मिळाला तर कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर किमान ५०२५ ते कमाल ५३१० इतके होते वाशिम च्या अनसिंग उपबाजार समिती त सोयाबीनला ५०५० ते ५२५० इतका दर मिळाला आहे. सोयाबीनच्या दरात घट झाल्यानंतर आवकही मंदावलेली असून शेतकरी अजूनही मोठ्या दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी एकूण उत्पादनाच्या ६० ते ७० टक्के सोयाबीन घरीच ठेवलं आहे.

सरकार बदललं, पण परिस्थिती नाही; नैराश्यात एसटी कर्मचारी नको ते करून बसला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here