मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या जमुईमध्ये ही घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. प्रियकराने पत्नी झालेल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. सलमा खातून असं ३२ वर्षीय मृत प्रेयसीचं नाव आहे. सलमाचं गावातील सनौलसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १३ फेब्रुवारीला ते विवाहबंधनात अडकले.
खरंतर, सलमाच्या कुटुंबियांचा लग्नासाठी नकार होता. दोघांच्या लग्नानंतर सलमाच्या वडिलांनी आणि काकांनी तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सनौलने एक लाख रुपये घेऊन सलमाशी लग्न केले होते. दोघांमध्ये विवाह प्रमाणपत्रावरून वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. लग्नानंतर घरी गेल्यानंतर सलमाचं वडिल आणि काकांशी बोलणं झालं होतं. पण त्यानंतर तिचा फोन बंद आला.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी खून…
मृत सलमाच्या काकांनी पोलिसांना सांगितले की, ‘मुलीचा फोन बंद आल्यानंतर आम्ही सगळे तिच्या घरी पोहोचलो, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. यानंतर आम्हाला संशय आला आणि आम्ही शोधाशोध सुरू केली. यावेळी सलमाचा मृतदेह आम्हाला घराच्या मागील विहिरीजवळ आढळून आला. तातडीने आम्ही याची माहिती पोलिसांना दिली.’ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत सलमाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.