नाशिक : नाशिक शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या बरोबरच संबंधिताने महिलेची लाखो रुपयांची फसवणूकही केली आहे. ही धक्कादायक घटना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर स्वरुपाच्या प्रकरणात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील मदिना चौक भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित आणि संशियत आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्यातेही पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलेआहे. तसेच आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा मुख्य आरोप या पीडित महिलेने केला आहे.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार?; रोहित पवार यांच्या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
सोबतच पीडितेला अनेक वेळा मारहाण करत तिच्याकडून लाखोंची रक्कम उकळली असल्याचेही पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीला घर घेण्यासाठी पैशांची आवश्यकता भासली असताना आरोपीने पीडित महिलेकडून ३ लाख रुपयांची रक्कम घेतली. तसेच एकदा बुलेट ही दुचाकी घेण्यासाठी ८० हजार रुपये देखील घेतले. आरोपी इतक्यावरच न थांबता पुन्हा दुसरी दुचाकी घेण्यासाठी ८० हजार रुपये मारहाण करत घेतले, असे पीडितेचे म्हणणे आहे. पीडितेला आता हे सर्व सहन न झाल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेत संशयिताच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

आफ्रिकेत पसरला नवा प्राणघातक मारबर्ग व्हायरस, आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू, WHO ची चिंता वाढली
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराबरोबरच फसवणूक करणे आणि आणखी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतप्त झालेल्या नागरिकांकडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

व्हॅलेंटाइन डेला गुलाब नाही, ही वस्तू जास्त विकली गेली, केवळ प्रौढ वापरतात, विक्रीचे रेकॉर्ड तुटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here