धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या धुळे-शिरपूर बसचा भीषण अपघात झाला असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई-आग्रा महामार्गावर ओव्हरटेकच्या नादामध्ये कंटेनरला बसने पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातामध्ये बस चालकासह वाहक व दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर नरडाणा गाव परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या अपघाताची माहिती संबंधित पोलिसांना दिली. त्यानंतर लागलीच पोलीस अधिकारी व कर्मचारीदेखील तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

फक्त रात्रभर चालला संसार! किस डेला लग्न अन् व्हॅलेंटाईनला नव्या नवरीचा अंत, विहिरीजवळ सापडली
या बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते. परंतु, सुदैवाने २ प्रवासी वगळता इतर प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नसली तरीही या अपघातात बसचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर मुंबई-आग्रा महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परंतु, पोलीस प्रशासनाकडून लागलीच काही वेळात दोन्ही अपघातग्रस्त वाहने तात्काळ बाजूला करण्यात आली व वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना पोलिसांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. यामध्ये बस चालक हा गंभीर जखमी असून बाकी दोन प्रवासी हे देखील जखमी आहेत. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने अखेर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. महामार्गावर गेल्या महिन्याभरापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. हे अपघाताची मालिका थांबवण्यासाठी महामार्ग पोलीस आणि संबंधित टोल प्रशासनाने दखल घेऊन ठीक ठिकाणी सूचनाफलक लावण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

समृद्धी महामार्गावर भरधाव कार थेट संरक्षण कठड्यावर चढली, ३० फूट खोल पडता-पडता…; पाहा VIDEO

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here