बे ओव्हल: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिली कसोटी सुरू आहे. बे ओव्हल येथे सुरू असलेल्या डे-नाईट कसोटीत प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ३२५ धावा केल्या. उत्तरादाखील पहिल्या डावात न्यूझीलंडची ३ बाद ३७ अशी बिकट अवस्था झालीय.

इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अ‍ॅडरसन शानदर लयीमध्ये दिसतोय. त्याच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडचे फलंदाज फक्त बघतच राहिले. अ‍ॅडरसनने दिवस संपण्याच्या आधी न्यूझीलंडला दोन धक्के दिले. अ‍ॅडरसनने आधी केन विलियमसन याला बाद केल्यानंतर हेन्नरी निकोल्स फलंदाजीवर आला. अँडरसनने निकोल्सला शॉट् डिलीव्हरी टाकली आणि हा चेंडू निकोल्सला कळालाच नाही. चेंडूने काही क्षणात बॅटचा स्पर्श केला आणि तो थेट स्लिपमध्ये फिल्डिंग करणाऱ्या जॅक क्रॉलीने शानदार कॅच पकडला.

दिल्ली कसोटीत अख्ख्या भारताला प्रतिक्षा एका खास शतकाची; गावस्कर ते विराट एकाही दिग्गजाला जमले नाही
जेम्स अ‍ॅडरसनच्या गोलंदाजीपुढे दिग्गज विलियमसनचे देखील काही चालले नाही. विलियमसन जेम्स अ‍ॅडरसनच्या चेंडूवर LBW झाला. इंग्लंडकडून अ‍ॅडरसन १२वे षटक टाकले. या ओव्हरमधील दुसरा चेंडू त्याने गुड लेंथचा टाकला जो टप्पा पडल्यानंतर थेट विलियमसनच्या पायाला लागला. अपील केल्यानंतर अंपायरने नॉट आउट दिले. त्यावर बेन स्टोक्सने रिव्हूय घेतला जो इंग्लंडच्या बाजूने लागला. अ‍ॅडरसनने ७ ओव्हरमध्ये १० धावात ४ ओव्हर मेडन टाकत २ विकेट घेतल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ३७ धावांवर ३ महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या.

त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात ९ बाद ३२५ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन डॅकतने ८४ तर हॅरी ब्रूकने ८९ धावा केल्या तर अखेरच्या षटकात बेन फोक्सने ३८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात नील बेगनरने चार तर टीम साऊदीने दोन विकेट घेतल्या.

IND vs AUS: दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज; विजयाचा हुकमी एक्का संघात परतला
असा आहे इंग्लंडचा न्यूझीलंड दौरा

पहिली कसोटी- १६ ते २० फेब्रुवारी
दुसरी कसोटी- २४ ते २८ फेब्रुवारी

हे दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे या मालिकेच्या निकालाचा WTCच्या गुणतक्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. न्यूझीलंडने गेल्या वर्षी पहिल्या WTCचे विजेतेपद मिळवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here