उस्मानाबाद : स्वकष्टाने मिळवलेले धन इतरांना देण्यासाठी दानत्व लागते. मिळेल तो रोजगार करुन मजुरी करायची आणि पती, पत्नीची जमा झालेली रक्कम शाळेतील विविध उपक्रमाला दयायची यासाठी मोठे मन आणि धैर्याची आवश्यकता आहे. कर्तबगार मुलगा हृदयविकाराच्या धक्क्याने गेल्यामुळे हताश झालेला मजूर मजुरी करुन जमा झालेली मजुरी लहान मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचे ठरवतो हे याचेच एक उदाहरण. उपक्रम खामसवाडी तालुका कळंब येथील आत्माराम सोनवणे या मजुराने हा उपक्रम सुरू केला आहे.

स्पप्न राहिले अपूर्ण

आत्माराम सोनवणे (वय ६५ वर्षे, रा- खामसवाडी) यांचा गोपाळ नावाचा मुलगा ७ एप्रिल २०१६ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने मयत झाला. तो उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात शिपाई पदावर कार्यरत होता. एम.ए.बी.एड एवढे शिक्षण झाल्यामुळे गोपाळ सोनवणे हे UPSC, MPSC अशा परीक्षा नेहमी देत. जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न गोपाळ यांनी पाहिले होते. मात्र, नियतीने धोका दिल्यामुळे गोपाळ यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

पोटच्या मुलाशी बाप इतका निर्दयी कसा वागू शकतो?, बापाच्या धक्कादायक कृत्याने अंबरनाथ हादरले
मुलांने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्माराम सोनवणे हे पत्नीसह मजुरी करतात. वर्षभर जमा झालेली मजुरी ते शाळेतील विदयार्थीसाठी खर्च करतात. ही रक्कम ते पुस्तके, वहया, बसायला बेंच बनवून देण्यावर खर्च करतात. शिवाय ७ एप्रिल रोजी गोपाळ यांची पुण्यतिथी असते. या दिवशी ते ५००/१००० विदयार्थ्यांना जेवण देतात. गेली ६ वर्षे हा उपक्रम अविरत पणे सुरु आहे.

आधी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, मग केला वारंवार अत्याचार, मारहाण करून पैसेही उकळत राहिला, नाशकात खळबळ
मुलाचे स्वप्न होते जिल्हाधिकारी व्हायचे , पण ते पूर्ण झाले नाही. पण यातला १ जरी विदयार्थी जिल्हाधिकारी झाला तर माझे स्वप्न पूर्ण होईल, असे आत्माराम सोनवणे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार?; रोहित पवार यांच्या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here