“अरे बापरे, एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिल्याने आमचे धाबेच दणाणले! आम्हाला आता काळजी घेतली पाहिजे…” अश्या शब्दात अजित पवार यांनी मनसेला डिवचलं. त्यामुळे आता या टीकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, कसब्याची पोटनिवडणूक लढवण्यासाठी मनसेमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या होती. मात्र असं असतानाही मनसेने भाजपला पाठिंबा देऊन नवी खेळी खेळली आहे. आता मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये जोरदार जुंपल्याचे चित्र दिसत आहे. कसब्यात उमेदवार भाजप आणि काँग्रेसचे, तर भांडण मात्र मनसे राष्ट्रवादीत असं चित्र आहे.
मुंबईत मनसे पुणे शहर कार्यकारिणीने राज ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत भाजपला पाठिंबा द्यायचा, मात्र प्रचारात सहभागी व्हायचं नाही असा निर्णय झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मनसेला चांगलंच फैलावर घेतलं होतं. ‘कोथरूड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देतात. बोल घेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत’ असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं. त्यावर ‘लग्न लोकाचं प्रशांत जगताप नाचतंय येड्या भो..चं’ असं ट्विट करत मनसेच्या साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.