मुंबई: देशभरासह महाराष्ट्रात करोनाचं संकट अधिक गहिरं होत आहे. या संकटात खबरदारीचे उपाय म्हणून नागरिक सॅनिटायझर, मास्कची खरेदी करतात. पण या संकटातही सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. क्राइम ब्रँचच्या युनिट ३ च्या पथकानं बनावट मास्क () विकणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडील जवळपास २१ लाख रुपये किंमतीचे मास्क जप्त करण्यात आले आहेत.

करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अशा काळात काही जण गैरमार्गानं आपले खिसे भरण्याचे काम करत आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट ३च्या पथकाने अशाच एका आरोपीला अटक केली आहे. बनावट एन ९५ मास्क विक्रीच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. सफदर हुसैन मोमिन असे त्याचे नाव आहे. डीसीपी अकबर पठाण आणि निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडील जवळपास २१ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे बनावट मास्क जप्त केले आहेत.

व्हिनस कंपनीच्या नावाखाली हे मास्क तयार करून विकले जात होते. याबाबत कंपनीला माहिती मिळाली असता, त्यांनी पोलिसांत कळवले. त्यानंतर पोलिसांनी गोदामावर छापेमारी केली. या कंपनीचे एन ९५ मास्क हे देशभरातील अनेक रुग्णालये आणि अन्य ठिकाणी डॉक्टरांकडून वापरले जात आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे मास्क खूपच सुरक्षित असल्याचे मानले जाते. पोलिसांनी जप्त केलेले एन ९५ मास्क हे बनावट आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू होता

करोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केला होता. ५४०० रुपये किंमतीचं हे इंजेक्शन काळ्याबाजारात ३० हजार रुपयांहून अधिक किंमतीला विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. चढ्या किंमतीनं इंजेक्शनची विक्री करणाऱ्या या टोळीचा मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पर्दाफाश केला होता. बोगस ग्राहक बनून सापळा रचला आणि हे रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here