गोरेगावतील सभा झाली आणि चक्र फिरली
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांचा भाऊ १८ वर्षांपूर्वी घरातून निघून गेल्याची माहिती दिली. त्यानं घर सोडल्यानंतर ३ महिने भावाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नव्हता,असं सुषमा अंधारे म्हणाल्या. पुण्यामध्ये सासवड, वाघोली, खराडी, पुणे स्टेशन आणि राज्याबाहेरही शोधण्याचा प्रयत्न केला मात्र भाऊ सापडला नव्हता, असं अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. गोरेगावमध्ये झालेल्या शिवसंवाद यात्रेच्या सभेवेळी बॅनर्स झळकले होते. त्या सभेच्या बॅनर्सवर माझा फोटो भावानं पाहिल्याचं सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.
बारामतीचा मेळावा आटोपून घरी परत येत असताना भावाचा फोन आला आणि त्यानं मुंबईत असल्याचं सांगितल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. काही वेळातच पुन्हा फोन बंद येत असल्यानं आमदार सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं आणि शोध मोहीम सुरु झाली. मुंबईत ठिकठिकाणी शोध मोहीम सुरु झाली आणि रात्री दीड वाजता दुरावलेला भाऊ मिळाल्याचं सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे. यासाठी त्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि आमदार सचिन अहिर यांचं विशेष आभार मानले आहेत.
घरातून निघून गेलेला भाऊ १८ वर्षानंतर भेटल्यानं अचानक नियतीला ही आमचं हे वाट बघत राहण पाहून जणू पान्हा फुटला, अशा भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या आहेत.