नवी दिल्ली : २०१९ साली कोचिंग सेंटरमध्ये निक्की यादव आणि साहिल गेहलोत यांची ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोन वर्ष दोघं एकत्र राहत होते. जेव्हा गेहलोत कुटुंब साहिलवर अन्य महिलेशी विवाह करण्यास जबरदस्ती करु लागले, तेव्हा निक्कीनेही साहिलमागे लग्नाची भुणभुण सुरु केली. त्यावेळी साहिल निक्कीशी लग्न करण्याबाबत विचारही करु लागला, मात्र तिच्या तोंडून आपल्या पालकांविषयी अपशब्द ऐकले आणि त्याची सटकली, असा आरोप होत आहे.

लग्नाच्या आदल्या रात्री ११ वाजताच्या सुमारास निक्की आणि साहिल घराबाहेर पडले होते. काश्मिरी गेटजवळ थांबून कारमध्येच पुन्हा दोघं जवळपास तासभर भांडत होते. त्यावेळी संतापाच्या भरात गाडीतील डेटा केबलने गळा आवळून निक्कीचा खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आपल्याच ढाब्यावर जाऊन तिथल्या डीप फ्रीजमध्ये त्याने निक्कीचा मृतदेह ठेवल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे त्याच दिवशी तो बोहल्यावरही चढला.

साहिलचा साखरपुडा झाल्याचं ९ फेब्रुवारीला निक्कीला समजलं. नंतर त्यांची भेट झाली. त्यांनी गोव्याला पळून जायं ठरवलं. पण साहिलला गोव्याची तिकिटे मिळाली नाहीत, तेव्हा त्यांनी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला पळून जाण्याचा प्लॅन आखला. ते आधी आनंद विहार आणि नंतर काश्मिरी गेटवर पोहोचले.

साडेसातला घराबाहेर पडले, नंतर कुठे गेले? तीन लेकरांच्या बापाची मारेकरी निघाली त्याचीच…
साहिलच्या पालकांना याबाबत कुणकुण लागली होती. त्यामुळे त्यांनी साहिलवर परत येण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. साहिल परत जायला निघाला, तेव्हा निक्कीने त्याच्याशी भांडायला सुरुवात केली. आपण आत्महत्या करुयात, असंही निक्कीने साहिलला सुचवलं, पण त्याला ते मान्य नव्हते. जेव्हा निक्कीने त्याच्या पालकांबद्दल अपशब्द बोलण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला संताप अनावर झाला आणि त्याने तिचा गळा दाबला.
माझ्या बाळाला भेटायचंय, मित्राला फोन करुन रडला; विहिरीजवळ चप्पल दिसताच सर्वांना धस्स झालं!
मागच्या सीटवर निक्कीचा मृतदेह ठेवून साहिलने दिल्लीत जवळपास ४० किलोमीटर गाडी चालवली. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या कुटुंबाने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. परंतु, मी माझ्या मैत्रिणीची हत्या केली आहे, असं साहिलने दुसऱ्याच दिवशी आपल्या बायकोला सांगितल्याचंही बोललं जातं. तू माहेरी निघून जा, असं त्याने सुचवल्यामुळे साहिलला अटक होण्यापूर्वीच ती परत गेली.

शिंदे-फडणवीसांनी ज्याचा आधार घेतला, त्यावरच पहिला घाव, ठाकरेंच्या वकिलाने टेन्शन वाढवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here