मुंबई : आज आठवड्यातील शेवटचे ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरणीसह सुरुवात झाली आहे. अमेरिकन बाजारात मोठ्या घसरणीसह बंद झाले आणि आशियाई देशांच्या बाजारातील घसरणीसह व्यापाराचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ३२५ अंकांनी घसरून ६० हजार ९९३ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी ६१ अंकांच्या घसरणीसह १७,९७४ अंकांवर खुला झाला.

अमेरिकन शेअर बाजाराची स्थिती
गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह व्यापार बंद झाले. डाऊन जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज १.२६ टक्के म्हणजेच ४३१ अंकांनी घसरून ३३,६९६ च्या पातळीवर बंद झाला. तर, नॅसडॅक कंपोझिट २१४ अंक किंवा १.७८% घसरला आणि ११,८५५ वर बंद झाला. याशिवाय एस अँड पीमध्ये १.३८% घट होऊन ५७ अंकांची घसरून ४०९० च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आशियाई बाजारात देखील घसरण होताना दिसत आहे. निक्केई ०.७१ टक्के, हँगसेंग ०.४६ टक्के, तैवान ०.५६ टक्के, कोस्पी ०.७४ टक्के घसरून व्यापार करत आहेत.

अदानी शेअर्स सोडा! गुंतवणूकदारांना मालामाल करतील हे स्टॉक्स, कमाईसाठी लिस्ट सेव्ह करा
क्षेत्रीय निर्देशकांची स्थिती
बाजाराच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल आणि वायू, फार्मा, ऑटो क्षेत्रातील समभाग लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. तर धातू, मीडिया, इन्फ्रा, ऊर्जा क्षेत्रातील समभागात तेजी दिसून येत आहे. याशिवाय मिडकॅप्समध्ये घसरण होत असून स्मॉल कॅप शेअर्स तेजीसह व्यवहार होत आहेत. सेन्सेक्समधील ३० पैकी ९ शेअर्समध्ये तेजी दिसत आहे तर २१ समभाग घसरताना दिसत आहेत. तसेच निफ्टीचे ५० पैकी १७ समभाग वाढून तर ३३ समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Short Selling नेमकं असतं काय? तुम्हीही करू शकता ‘शॉर्ट सेलिंग’, होईल तगडी कमाई
कोण ठरले टॉप गेनर्स
आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवसाच्या सुरुवातीला अल्ट्राटेक सिमेंट २.७३%, लार्सन ०.७०%, टाटा स्टील ०.६७%, HUL ०.३९%, एशियन पेंट्स ०.३३%, मारुती सुझुकी ०.2५%, रिलायन्स ०.२२%, भारती एअरटेल ०.१७%, पॉवर ग्रिड ०.७%, पॉवर ग्रिड ०.७% तेजीने व्यवहार करत आहेत.

३ रुपयाचा शेअर ठरला खजिन्याची किल्ली, दिला हजारपट परतावा; स्टॉक खरेदी करणार का?
टॉप लुझर्स शेअर्स
दुसरीकडे नेस्ले २.४३ टक्के, इंडसइंड बँक १.२५ टक्के, विप्रो १.२१ टक्के, एचसीएल टेक १.०३ टक्के, इन्फोसिस ०.९१ टक्के, टीसीएल ०.९० टक्के, टेक महिंद्रा ०.८९ टक्के, एचडीएफसी ०.०७ टक्के, एचडीएफसी ०.०७ टक्के, सन फार्मा ०.०७ टक्के. बँक ०.५७% घसरण होताना दिसतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here