मंगलाबाई या मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील असल्याची माहिती मिळत आहे. मंगलाबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिहोर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याठिकाणी दोन हजार लोक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. भाविकांची गर्दी वाढल्याने या गर्दीत काही महिला या बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे.
रुद्राक्ष वाटपासाठी ४० काउंटर सुरु करण्यात आले आहेत. गर्दी पाहता रुद्राक्ष वाटप बुधवारपासूनच सुरू झाले होते. पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक भाविकांना रूद्राक्ष वाटप करण्यात आले असून रुद्राक्ष दर्शनासाठी दोन किलोमीटर लांब रांग आहे. दोन लाखांहून अधिक भाविक रांगेत उभे असल्याचा अंदाज आहे. गर्दी रोखण्यासाठी बांबू आणि दोर लावून बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी ते तोडके पडत आहे. भाविकांची गर्दी वाढतच जात असून मोबाईल नेटवर्क जाम असल्याने एकमेकांमध्ये संपर्क होत नसल्याचे भाविकांनी सांगितले.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील ३ महिला या तिथे बेपत्ता झालेल्या आहेत. त्यांच्या शोधासाठी त्यांचे कुटुंब मध्य प्रदेशकडे रवाना झालं आहे.