नवी दिल्ली : सराफा बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात चढ-उताराचे सत्र सुरूच आहेत. सलग तिसऱ्या आठवड्यात किमती घसरल्यामुळे भारतातील सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५६ हजाराच्या खाली पडला आहे. कालच्या व्यवहार सत्रात वाढ नोंदवल्यानंतर, शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदी दोन्ही मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती $१,८३० प्रति औंस या समर्थन पातळीच्या खाली घसरल्या.

देशातील सोने-चांदीचे दर जाणून घ्या
गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी बाजार बंद झाला तेव्हा सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे ५६,२२८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि ६५,६३३ रुपये प्रति किलोवर होते. भारतातील सोन्या-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. यासोबतच सोन्याची किंमत आणि जागतिक मागणी यातही महत्त्वाची भूमिका बजावते.

Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण, तुम्हाला होईल का फायदा?
दरम्यान, ५ एप्रिल २०२३ रोजी परिपक्व होणाऱ्या सोन्याच्या फ्युचर्समध्ये एमसीएक्सवर ३८७ रुपये किंवा ०.६९% घट होऊन ५५ हजार ९७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत आहेत. तर ३ मार्च २०२३ रोजी परिपक्व होणारे चांदीच्या वायदे किमतीतही एमसीएक्सवर ६१३ रुपये म्हणजे ०.९३ टक्क्यांनी घसरणीसह ६५ हजार २२८ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

सोन्याचा दर कसा तपासायचा
आजच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदीला जाण्याचा विचार करत असाल तर खरेदीला जाण्यापूर्वी तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस्ड कॉल देऊन किमती जाणून घेऊ शकता. अशाप्रकारे काही वेळाने तुमच्या नंबरवर एसएमएसद्वारे आजच्या दिवसाची सोन्याची किंमत समजेल.

मुलीच्या लग्नाचं टेन्शन नाही! लग्नाचा विमा काढा आणि निर्धास्त राहा, वाचा सविस्तर तपशील
लग्नसराईत मागणी वाढण्याची शक्यता
देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून या काळात सोन्याच्या दागिन्यांची चांगली मागणी असते. त्यामुळे येत्या काही महिन्यांत सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात होण्याची अपेक्षा असल्याने ज्वेलर्सनी जानेवारीत कमी सोने खरेदी केले. मात्र, यावर कोणताही निर्णय न झाल्याने उलट चांदीवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली.

बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या तुमच्या मौल्यवान वस्तू चोरी झाल्यास जबाबदारी नेमकी कोणाची? RBIचा नियम काय सांगतो
राज्यातील सोन्याचे दर
राज्यातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर सध्या ५६,५१० रुपयांच्या आसपास आहेत. यामुळे सोन्याच्या महागड्या किंमतींमुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह काहीसा थंडावलेला दिसत आहे. तसेच राज्यातील सराफा बाजारांमध्ये चांदीचा दर ६८,६०० रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. मार्च एप्रिल नंतर लग्नसराईचे मुहूर्त असल्याने येत्या काही महिन्यात सोन्याची मागणी पुन्हा वाढेल असेल, सराफा व्यवसायिकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here