Girish Bapat Health Deteriorates: कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हायलाइट्स:
- गिरीश बापट काल केसरीवाडा येथील मेळाव्याला उपस्थित होते
- या मेळाव्यात गिरीश बापट यांनी भाषणही केले होते
गिरीश बापट यांना सध्या आठवड्यातून दोनवेळा डायलिसिस करावे लागते. त्यामुळे बापट सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात. परंतु, काल त्यांनी पक्षासाठी कसब्याच्या प्रचारात सहभाग घेतला. मात्र, आज लगेच त्याचा परिणाम झाला असून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे गिरीश बापट यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष गिरीश बापट यांच्या प्रकृतीकडे लागले आहे. अद्याप डॉक्टरांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, आजचा प्रकार पाहता गिरीश बापट पुन्हा कसब्याच्या प्रचारात सहभागी होतील, ही शक्यता जवळपास मावळली आहे.
गिरीश बापट यांनी काल भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतही अजिबात चुरस नाही. भाजपचाच उमेदवार येथे विजयी होईल. फक्त थोडे अधिक कष्ट घेण्याची गरज आहे. त्याप्रमाणे काम करा, विजयाचे पेढे भरवायला मी स्वत: येईन, अशा शब्दांत गिरीश बापट यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला होता. आजारपणामुळे दीर्घकाळानंतर गिरीश बापट पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले. व्हीलचेअर, बोटाला ऑक्सिमीटर, नाकात नळ्या आणि सोबत ऑक्सिजन सिलिंडर अशा स्थितीत बापट यांना पाहून कार्यकर्त्यांना गहिवरून आले होते. यावेळी गिरीश बापटही भाषण करताना भावनावश झाले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Long-Term Effects. Comprehensive side effect and adverse reaction information.
medication for ed
Medscape Drugs & Diseases. What side effects can this medication cause?