nagpur eunuch ransom, नवरदेवाने ११०० दिले, पण तृतीयपंथी ११ हजारांसाठी अडले; नागपुरात पाच जणांवर खंडणीचा गुन्हा – maharashtra crime news nagpur transgender eunuch booked for ransom at wedding house and traffic signal
नागपूर : नागपूर पोलिसांनी तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि गिट्टी खदान पोलिसांनी दोन प्रकरणात ही कारवाई केली आहे. पहिल्या कारवाईत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पोलिसांना दाखवलेल्या इन्स्टाग्राम व्हिडिओच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. तर सामान्य नागरिकांकडून तृतीयपंथीयांनी खंडणी वसूल केल्याच्या तक्रारीनुसार दुसरी कारवाई करण्यात आली.
नागपूर शहरातील अलंकार चौकातील ट्रॅफिक सिग्नलवर तृतीयपंथी जबरदस्तीने नागरिकांकडून पैशांची मागणी करताना दिसले. या व्हिडीओचा तपास केला असता यात 19 वर्षीय आकांक्षा तुकाराम बनसोड, 26 वर्षीय मुस्कान सुनील शेख, 31 वर्षीय श्वेता शामराव पखाले, 24 वर्षीय वैशाली पाटील व 26 वर्षीय अम्मू भगत अशी पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथींची ओळख पटली आहे. हे सर्व जण अंबे नगर भांडेवाडी येथील रहिवासी आहेत. तपासासाठी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. प्राथमिक तपासानंतर आणि व्हिडिओमध्ये दिसणार्या तृतीयपंथीयांची ओळख पटल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या एका प्रकरणात विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या तृतीयपंथीयांच्या मागणीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नर्मदा कॉलनी परिसरातील प्रशांत पाटील यांच्या घरी विवाह सोहळा सुरू होता. दरम्यान, सोनू गौरे, छोटी गजभिये, जान्हवी स्टीफन पीटर, डिंपल जॉन गजभिये आणि परी गजभिये या सर्व झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी मागणीसाठी त्यांच्या घरी पोहोचले.
बल्बसाठी CCTV पाहिला, दिसली नग्न महिला; बिल्डिंगभर हिंडली अन्… मुंबईतील रहिवाशांची तक्रार तृतीयपंथीय घरी पोहोचल्यानंतर प्रशांत पाटील आनंदाने 1100 रूपये देत होते मात्र तृतीयपंथीयांची मागणी 11 हजार रूपयांची होती. दरम्यान, विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या एका दक्ष नागरिकाला पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची माहिती मिळाली. तृतीयपंथीयांबाबत त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या पाच तृतीयपंथींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सामान्य नागरिकांकडून तृतीयपंथीयांनी खंडणी वसूल केल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन यापूर्वी एक आदेश जारी केला होता. या आदेशान्वये तृतीयपंथीयांना नागरिकांकडून पैशांची मागणी करण्यास बंदी घालण्यात आली होती. शहरात तृतीयपंथींसाठी तातडीने कलम 144 लागू करण्यात आली होते.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महेश आहेरांना मारहाण, जितेंद्र आव्हाडांसह ७ जणांवर गुन्हा दाखल