पुणे : पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अभ्यास करताना मुलगा मोबाईल बघत होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याला रागावलं. त्या रागातून बारावीत शिकणाऱ्या मुलाने स्वत:च्या आईचं डोकं भिंतीवर आदळून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तस्लीम जमीर शेख (वय ३७, रा. उरुळी कांचन) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. जिशन जमीर शेख (वय १८, रा. उरुळीकांचन) या बारावीतील मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Kasba Bypoll: ऑक्सिजन सिलिंडर लावून कसब्यातील मेळाव्यात भाषण केलं, दुसऱ्याच दिवशी गिरीश बापटांची तब्येत बिघडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती. मुलगा जिशान हा घरात अभ्यास करत असताना मोबाईल पाहात होता. तो मोबाईल पाहत असल्याचं पाहून त्याची आई त्याच्यावर चिडली आणि त्याला रागावली. तसेच त्याला कानाखाली देखील मारली. त्यामुळे जिशानला राग आला. त्याने आईला जोरात भिंतीकडे ढकलले आणि तिचा गळा देखील दाबला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

आपली आई हालचाल करत नसल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने ब्लेडने तिचे मनगट कापले. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्याने एक वायर फॅनला लटकवली आणि आईचा मृतदेह त्याच्याखाली ठेवला. काही वेळात वडील घरी आले. त्यांना आईने गळफास घेतला असल्याचे त्याने सांगून तिचा मृतदेह आपण खाली उतरवल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पत्नीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांना संशय आल्याने डॉक्टरांनी ससून हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. शवविच्छेदन झाल्यानंतर हत्या झाल्याचं उघड झालं. मुलाने केलेला बनाव त्याच्यावरच उलटला.

तस्लिम शेख यांनी आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. मात्र, डॉक्टरांच्या एका संशयाने हत्येचा पदाफार्श झाला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उरुळी कांचन येथील माऊली कृपा इमारतीत १५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली होती.

तिसऱ्यांदा सेल्फीसाठी भुणभुण, पृथ्वी शॉची सटकली; मित्राने सांगितली संपूर्ण घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here