मुंबई: ‘लॉकडाऊनच्या आडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बकरी ईदच्या कुर्बानीवर अडथळे आणत आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत. त्यामुळं सण साजरा करणं कठीण झालं आहे,’ असा आरोप मुंबईतील मुस्लिम मौलाना व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ही अडवणूक न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मौलानांची बुधवारी व्हर्च्युअल बैठक झाली. यावेळी राज्यातील सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. या सरकारनं मुस्लिम समाजाची निराशा केली आहे,’ असा आरोप बैठकीत करण्यात आला. ‘बकरी घेऊन येणारी वाहने चेकनाक्यांवर अडवली जात आहेत. एकावेळी दोनच बकऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळं लोकांना प्रचंड त्रास होत आहे, असा मुद्दाही मौलानांनी मांडला.

वाचा:

‘मुस्लिम आमदार व मंत्र्यांवर आम्हाला विश्वास होता. हे आमदार व मंत्री सरकारला बकरी ईदसाठी सुधारीत नियमावली जारी करण्यास भाग पाडतील, असं वाटत होतं. त्यांनी बरेच प्रयत्न केले. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनीही यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतरही मुस्लिम समाजाला दिलासा मिळाला नाही,’ असं ऑल इंडिया उलेमा कौन्सिलचे मौलाना मसूद दरयाबादी म्हणाले.

‘देवनारच्या कत्तलखान्यात एरवी रोज म्हशी कापल्या जातात. पण कुर्बानीसाठी म्हशी कापण्यास परवानगी नाही. हा कुठला नियम आहे, असा सवाल अमन कमिटीचे प्रमुख फरीद शेख यांनी केला. ‘याआधीचं फडणवीस सरकार सणाच्या आधी मुस्लिम एनजीओ, मौलाना आणि आमदारांची बैठक घ्यायचे. ठाकरे सरकारनं अशी कुठलीही बैठक घेतलेली नाही,’ असं शेख म्हणाले.

वाचा:

अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक मंडळाचे हैदर आझम यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘मुस्लिम मंत्री आणि आमदार सरकारकडे आपली भूमिका पोहोचवण्यात अपयशी ठरले आहेत,’ अशी टीका भाजपच्या मुस्लिम नेत्यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here