नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्यासाठी अनेक दिवसांनंतर आनंदाची बातमी आली आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी आणि अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ जानेवारीपासून अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सुरू झालेले घसरणीचे सत्र अजूनही सुरूच आहे. मात्र, गुरुवारी म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी अदानी समूहाच्या काही शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. पण याच दरम्यान, अदानी समूहाची नुकतीच लिस्टेड कंपनी, अदानी विल्मरबाबत ब्रोकरेजकडून सकारात्मक बातमी आली आहे.

अदानी विल्मरच्या लक्ष्य किमतीत वाढ

ब्रोकरेज फर्म केआर चोक्सी शेअर्स अँड सिक्युरिटीजने अदानी विल्मरमध्ये वाढीचा अंदाज वर्तवला असून स्टॉकबाबत सध्याच्या पातळीपेक्षा जास्त लक्ष्य किंमत ठरवली आहे. मागील काही दिवसांपासून अदानी विल्मरचा स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून जवळपास ५०% घसरला आहे. स्टॉकचा एक वर्षाचा उच्चांक रु. ८७८ आहे, जिथून शेअर घसरून सध्या ४३४ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. शेअरने गुरुवारी ५ टक्क्यांची शानदार वाढ नोंदवली.

Titan Share Price: बाजाराच्या अस्थिरतेला ‘टाटा’; एका आठवड्यात दिला हजार कोटींचा तुफान परतावा, वाचा तपशील
अशा स्थितीत ब्रोकरेजने स्टॉकसाठी सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे ४०% वाढून ५६९ रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे. मात्र, लक्षात घ्या की अदानी विल्मरचे शेअर्स ३९७ रुपयांवर असताना हे लक्ष्य देण्यात आले. या तेजीमागे कंपनीची ताकद आणि स्थिर व्हॉल्यूम वाढ सांगितली जाय असून कंपनीचा व्यवसाय आणखी वाढण्याचे अपेक्षित आहे. केआर चोकसी सिक्युरिटीजने म्हटले की कंपनीच्या वाढीची रणनीती खूप मजबूत आहे. याशिवाय अदानी विल्मर आंतरराष्ट्रीय बाजारांवरही लक्ष ठेवून असून कंपनी वेळोवेळी नवीन उत्पादने लाँच करण्याबरोबरच वितरण अधिक मजबूत करत आहे. यासोबतच कोहिनूर ब्रँडचे अधिग्रहण देखील कंपनीसाठी फायदेशीर ठरेल. म्हणूनच आता ब्रोकरेजने अदानी विल्मरमध्ये खरेदीचा (बाय) सल्ला दिला आहे.

मस्तच! १०० रुपयांपेक्षा स्वस्त शेअर, येत्या काळात देईल दमदार रिटर्न्स, वाचा
बाजारात सूचिबद्ध
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अदानी विल्मर भारतीय बाजारात सूचिबद्ध झाला होता. अदानी विल्मरमध्ये गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाची ५० टक्के भागीदारी आहे, तर उर्वरित ५० टक्के हिस्सा सिंगापूरच्या विल्मर कंपनीकडे आहे. ही कंपनी फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्यतेलाची बाजारात विक्री करते. याशिवाय कंपनी तांदूळ, मैदा, साखर यांसारख्या खाद्यपदार्थांचाही व्यवहार करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये साबण, हँडवॉश आणि हँड सॅनिटायझरसारख्या उत्पादनांचाही समावेश असून अदानी ग्रुपची ही कंपनी भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक आहे.

(नोट: शेअर बाजारातील गुंतवणूक करणे जोखीमचे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराशी सल्लामसलत करा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here