Girish Bapat health deteriorates | गिरीश बापट हे पाचवेळा कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यामुळे कसब्यात गिरीश बापट यांचा आजही दबदबा आहे. कालच्या मेळाव्यानंतर गिरीश बापटांची तब्येत काहीशी खालावली आहे.

 

Sharad Pawar on Girish Bapat health
गिरीश बापट कसब्याच्या प्रचारात

हायलाइट्स:

  • भाजपचा घायाळ वाघ कसब्याच्या प्रचारात उतरला
  • गिरीश बापटांची प्रकृती खालावली
  • दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु
पुणे: प्रकृती फारशी साथ देत नसतानाही भाजप नेते गिरीश बापट हे गुरुवारी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते. नाकात नळी, बोटाला ऑक्सिमीटर आणि सोबत ऑक्सिजन सिलिंडर अशा अवस्थेत गिरीश बापट केसरीवाड्यातील कार्यकर्ता मेळाव्यात शेवटपर्यंत बसले होते. यानंतर अनेकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली होती. गिरीश बापट यांची प्रकृती इतकी वाईट असताना त्यांना प्रचारासाठी का आणण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबद्दल प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली. गिरीश बापट यांना व्हीलचेअरवरून आणण्याची गरज होती का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटले की, गिरीश बापट यांना प्रचारात उतरवणे चूक की बरोबर, हे मला ठाऊक नाही. पण मी गिरीश बापट यांना भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती चांगली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. शरद पवार यांनी या मुद्द्यावर थेट बोलणे टाळत असले तरी राजकीय विरोधक भाजपवर टीका करताना दिसत आहेत.
नाकात नळी, ऑक्सिजन सिलिंडर… तरी व्हिलचेअरवरुन गिरीश बापट कसबा निवडणुकीच्या प्रचारात
गिरीश बापट यांनी केसरीवाड्यातील मेळाव्यात लहानसे भाषणही केले होते. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि गिरीश बापट दोघेही भावूक झाले होते. कसब्यातील विजयानंतर मी तुम्हाला पेढा भरवायला येईन, असा शब्दही गिरीश बापट यांनी दिला होता. गिरीश बापट यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गिरीश बापट यांच्या या झुंजार वृत्तीचे आणि पक्षाविषयी असलेल्या निष्ठेचे कौतुक केले होते. असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद, हीच भाजपची ओळख.
देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः ! गिरीशभाऊ…कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात. इथल्या मनामनांत तुम्ही भाजपाचे कमळ रुजवले. मतदारराजा तुमचा शब्द राखल्याशिवाय राहणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
Kasba Bypoll: भाजपचा घायाळ वाघ अखेर मैदानात, गिरीश बापट कसब्यात सभा घेणार

गिरीश बापटांना राजकारणाची ओढ स्वस्थ बसू देत नाही: संजय काकडे

गिरीश बापट यांना डॉक्टरांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता. तरीही गिरीश बापट कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. गिरीश बापट यांना राजकारणाची असलेली ओढ त्यांना घरात स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्या मेंदूत राजकारणाची खाज आहे. त्यांच्या रक्तात पक्ष भिनला आहे. ते स्वखुशीने प्रचारात सहभागी झाले होते, असे संजय काकडे यांनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here