जॉर्ज सोरोस काय म्हणाले?
अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी जर्मनीतील एका कार्यक्रमात बोलताना अदानींच्या मुद्यावरुन मोदींवर टीका केली. “अदानी समुहाकडून करण्यात येत असलेल्या काही चुकीच्या व्यवहारांमध्ये भारताचे पंतप्रधान सहभागी असू शकतात”, असा आरोप जॉर्ज सोरोस यांनी केला. मोदी यांना अदानींच्या प्रकरणी परकीय गुंतवणूकदारांना आणि ससंदेला उत्तर द्यावंच लागेल, असं जॉर्ज सोरोस म्हणाले. मोदी आणि अदानी हे निकटवर्तीय आहेत, असं देखी ल जॉर्ज सोरोस म्हणाले. अदानी यांनी स्टॉक मार्केटमधून निधी उभारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात अपयश आल्याचं जॉर्ज सोरोस म्हणाले.
जॉर्ज सोरोस यांचं भाषण
स्मृती इराणी यांचं प्रत्युत्तर
केंद्रीय मंक्षी स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत जॉन सोरोस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भारताच्या लोकशाहीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये विदेशी शक्तींचा हात असून त्यामध्ये जॉर्ज सोरोस हे देखील असल्याचं इराणी म्हणाल्या. स्मृती इराणी यांनी यापूर्वी विदेशी शक्तींना पराभूत केलं आहे, आताही करु, असं म्हटलं. जॉर्ज सोरोस यांनी भारतात मोदींना झुकवण्याची घोषणा केल्याचा दावा स्मृती इराणी येंनी केला. भारतात लोकशाही मार्गानं निवडण्यात आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न असेल तर प्रत्येक भारतीयाला त्याचं उत्तर द्यावं लागेल, असं स्मृती इराणी म्हणाल्या.
जॉर्ज सोरोस यांच्यावर काँग्रेसची टीका
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी देखील एक ट्विट करत जॉर्ज सोरोस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित अदानी प्रकरण भारतात लोकशाही बदलांची सुरुवात करते की नाही हे काँग्रेस, विरोधक आणि भारताची निवडणूक पद्धत यावर अवलंबून आहे”, असं जयराम रमेश म्हणाले.
जॉर्ज सोरोस यांच त्या प्रक्रियेशी काही घेणं देणं नाही. आमचा नेहरुवादी वारसा जॉर्ज सोरोस यांच्यासारखे लोक आमचे निवडणुकीचे निकाल ठरवू शकत नाहीत असा हल्लाबोल जयराम रमेश यांनी केला.
आता विरोधकांच्या हातात काहीच नाही, म्हणूनच वेळकाढूपणा होत आहे; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया