सोलापूर: मोहोळ तालुक्यातील पापरी येथे शेतकऱ्याच्या घरी असलेल्या ‘लक्ष्मी’ या गाईने एकाच वेळी तीन कालवड आणि एक खोंड अशा मिळून चार वासरांना जन्म दिला आहे. एकाच वेळी चार वासरांना गायीनं जन्म देण्याची पापरी परिसरातील ही पहिलीच आणि दुर्मिळ घटना असल्याने इतर शेतकरी गर्दी करत आहेत. इतर शेतकऱ्याकंडून गायीचं आणि तिचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याचे कौतुक होत आहे. सुरेश लोंढे दरवर्षी या ‘लक्ष्मी’ चा वाढदिवसही साजरा करतात.

पापरीतील गाईला पाहण्यासाठी गर्दी

मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी सुरेश मुरलीधर लोंढे हे शेती सोबतच पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. सध्या त्यांच्याकडे संकरित गाई,म्हशी अशी मिळून 12 दूध देणारे पशुधन आहे. त्यातील लक्ष्मी नावाच्या एका संकरित गाईने गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चार वासरांना जन्म दिला आहे.त्यात तीन कालवडी आणि एक खोंड आहे. लक्ष्मी गाईचे हे चौथे वेत आहे. गाईने एकावेळी चार पिलांना जन्म देण्याची ही घटना दुर्मिळ असल्याने परिसरातील शेतकरी सुरेश लोंढे यांच्या घरी गाई व त्याच्या पिलांना पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.या बाबत पेनूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही. बी. गावडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,गाई मध्ये दोन वासरांना जन्म देण्याचे प्रमाण आज पर्यंत निदर्शनास आले आहे.परंतु, एकाच वेळी तीन किंवा चार वासरे होण्याचे प्रमाण क्वचितच असते.

लग्न केल्याचं भासवलं, मंदिराच्या बाजूस खोलीवर तरुणीसोबत काय घडलं? तिला घरात घेण्यास नकार

पापरी येथील हे उदाहरण दुर्मिळ आहे, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन गाई आणि जन्म दिलेल्या वासरांची तपासणी केली असून दोन्हीची प्रकृती उत्तम आहे, असं डॉ. गावडे यांनी सांगितलं.

पृथ्वी शॉसोबत मुंबईत रस्त्यावर वाद;कोण आहे सपना गील?मोठ्या पडद्यावर रवि किशनसोबत केलंय काम

लोंढे कुटुंबीय करतात दरवर्षी ‘लक्ष्मी’ चा वाढदिवस साजरा

लोंढे कुटुंबीयांनी पशुधन सांभाळायला सुरुवात लक्ष्मी या गायीपासून पाच वर्षांपूर्वी केली होती. त्यापासूनच लोंढे यांच्या प्रपंचाची आर्थिक घडी व्यवस्थित बसली म्हणून सुरेश लोंढे कुटुंबिय या गाईस ‘लक्ष्मी’ असे संबोधतात.नोव्हेंबर महिन्यातील २४ तारखेला या गाईला घरी आणले होते, त्यामुळे दरवर्षी २४ नोव्हेंबर ला केक कापून वाढदिवस साजरा करतो असे लोंढे कुटुंबातील सदस्य गणेश लोंढे यांनी सांगितले.

Girish Bapat: गिरीश बापटांना प्रचारात उतरवणं चूक की बरोबर ठाऊक नाही, पण त्यांची प्रकृती चांगली नाही: शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here