आमचं कुटुंब शाकाहारी आहे. पण रेखाला मांसाहारी जेवणच आवडतं. मी तिला खाण्यास मनाई केली नाही. आम्ही माऊंट अबूला फिरायला गेलो. तेव्हा तिथे तिनं बियर मागवली. त्यावेळीही मी काहीच बोललो नाही, असं तरुणानं सांगितलं. काही दिवसांपूर्वी रेखाला अचानक तिच्या आईला फोन आला. जमिनीच्या कागदपत्रांसाठी रेखाला आसामला जायचं होतं. त्यासाठी मी तिला आसामचं तिकीट काढून ५० हजार रुपये असलेलं एटीएम कार्ड, १० हजारांचा मोबाईल फोन आणि ५ हजारांची रोकड दिली, असा घटनाक्रम पीडित तरुणानं कथन केला.
यानंतर रेखा आसामला पोहोचली. तेव्हा तिथून तिच्या वकिलाचा तरुणाला फोन आला. रेखाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कायदेशीर कागदपत्रं हाती आली, त्यावेळी त्यात रेखा दासऐवजी रेखा चौहान लिहिलं होतं. त्यानंतर तरुणानं गुगलवर रेखा चौहान टाईप करून सर्च केलं. तेव्हा त्याला पत्नीच्या गुन्ह्याची संपूर्ण कुंडली दिसली.
रेखा साधासुधी महिला नसून ती डॉन असल्याचं पीडित तरुणाला समजलं. रेखाच्या नावावर ५ हजार कार चोरी केल्याचा, लूटमार, हत्या आणि गेंड्याच्या शिकारीटा गुन्हा दाखल असल्याचं तरुणानं गुगलवर पाहिलं. आसाममधील न्यायालयानं तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यानंतर तरुणानं लग्न रद्द करण्यासाठी पोरबंदर मॅजिस्ट्रेटकडे याचिका दाखल केली आहे.