youth dies during police recruitment in mumbai, मुंबईत पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, १६०० मीटर धावला अन् खाली कोसळला – washim youth dies during police recruitment in mumbai runs 1600 meters and collapses
मुंबई : मुंबई पोलीस दलामध्ये सध्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. सांताक्रुझच्या कलिना येथील कोळे कल्याण मैदानात एका उमेदवाराचा आज सकाळी मृत्यू झाला. मैदानी चाचणीत धावताना चक्कर आल्याने हा तरुण कोसळला. २७ वर्षाचा हा तरुण वाशिमचा असल्याची माहीती आहे.
गणेश उगले, असे या तरुणाचे नाव आहे. आणि त्याने १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. गणेश हा चुलत भावासोबत मुंबईत आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्याकडे गणेशबाबत चौकशी केली. सकाळपासून त्याची प्रकृतीबाबत कोणतीच तक्रार केली नव्हती, असे गणेशच्या चुलत भावाने सांगितले. टॅक्सीचे ‘स्टेअरिंग’ही महिलांच्या हाती; ५० टक्के महिला चालक नियुक्त करण्याचा ‘बेस्ट’चा निर्णय