जालना : जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकरी वर्गाची खासियत आहे ती म्हणजे इथले शेतकरी अनेक वर्षांपासून रताळ्याची शेती करत आहेत.गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातील ५ एकर,२ एकर,१ एकर, अर्धा एकर नाहीच जास्त तर किमान १० गुंठे,५ गुंठे आणि कमीत कमी १ गुंठा का होईना रताळ्याचे पीक घेतोच घेतो हे विशेष. त्यामुळेच लोणगाव हे रताळ्याचे आगार मानले जाते.
आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळ्याला उपवासाच्या मेनू मध्ये मानाचे स्थान असते.कुणी साखरेच्या पाकात त्याचे गुलाब जामुन बनवतात तर कुणी उकडवून दुधासोबत खातात.यात फायबर चे प्रमाण खूप जास्त असल्याने नियमित खण्यासोबतच लोक उपवासासाठी रताळ्याला पसंती देतात.त्यामुळे फराळ म्हणून याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

सध्या शेतकऱ्यांचा रताळ्यांचा हंगाम सुरू झाला असून लोणगाव येथील शेतकऱ्यांनी काढलेली रताळे महाशिवरात्रीसाठी बाजारात आली आहेत,त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते आहे.

साधारणतः जून महिन्यात रताळ्याची लागवड केली जाते.७ महिन्यानंतर रताळ्याची काढणी सुरू होते.ही वेळ साधारणतः महाशिवरात्रीच्या काळात येत असल्याने शेतकऱ्यांकडून व्यापारी जागेवरून रताळी घेऊन जातात.रताळे हे पीक कमी खर्चात आणि कमी वेळेत हलक्या प्रतीच्या भुसभुशीत जमिनीत उत्तम प्रकारे निघते. लोणगाव परिसरात त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

प्रेमासाठी युगुलाने घर सोडलं, ६ महिने पळून-पळून पैसेही संपले; पोलिसांत सरेंडर केलं पण अडकले…

खरीप हंगामात पावसाळ्यात या पिकाला पाणी देण्याची देखील गरज भासत नाही. पीक व्यवस्थापन खर्च कमी असतो त्यामुळे उत्पन्नही चांगल्यापैकी होते. मजुरांकडून रताळ्याची काढणी झाल्यावर शेतकरी त्याला पोत्यात भरून ठेवतात.

जालना,औरंगाबाद,टेंभुर्णी,सिल्लोड जवळच्या जिल्ह्यातील व्यापारी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन रताळ्याची ठोक खरेदी करतात.काही शेतकरी स्वतः बाजारपेठेत जाऊन किरकोळ पद्धतीने देखील विक्री करतात.परंतु, वाहतुकीचा खर्च वाचवत बहुतांश शेतकरी व्यापाऱ्यांना ठोक भावात रताळ्याची विक्री करून मोकळे होतात.

यावर्षी पाणी मुबलक असल्याने लोणगावात मोठ्या प्रमाणात रताळ्याचे पीक घेतले गेले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शेतकऱ्यांनी रताळे पिकाची लागवड केली होती.यावर्षी लोणगाव येथील शेतकरी श्याम रामेश्वर सावंत यांना अडीच एकरमध्ये जवळपास ७०० कट्टे इतके रताळ्याचे उत्पादन झाले असून १ कट्टा हा ४० ते ४२ किलोंचा असतो.म्हणजेच कमीजास्त पण २५० क्विटल पेक्षा जास्त रताळ्याचे उत्पन्न झाले आहे. सध्या व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन १,५०० रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी करत आहेत.

पुजाराच्या १००व्या कसोटीत अश्विनचा धमाका; तिघा फलंदाजांना बाद करत केला सर्वात मोठा रेकॉर्ड

लागवडी पासून ते तोडणी पर्यंतचा़ खर्च हा जवळपास ३०० रुपये क्विंटल इतका येत आहे. श्याम सावंत यांच्या शेतातील २०० क्विंटल रताळ्याची विक्री झालेली असून खर्च वजा जाता त्यांना निव्वळ अडीच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अजून ५० ते ८० क्विंटल रताळी काढणी झाली असून त्याचे उत्पन्न देखील मिळणार आहे.

लोणगावातील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी रताळ्याचं पीक घेतले असून जवळपास सगळ्यांची विक्री संपत आली आहे. थोड्याफार रताळ्याची विक्रीची बाकी असून नित्य बाजारात ती विकली जातात.

मुंबईत पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, १६०० मीटर धावला अन् खाली कोसळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here